आंदोलनगुन्हेगारीसामाजिक
मनमाडला अवैध धंद्याचा सुळसुळाट, जयश्री शिंदे यांचे उपोषण सुरू

0
2
5
6
2
9
मनमाडला अवैध धंद्याचा सुळसुळाट, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सेवाभावी संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष जयश्री शिंदे यांचे उपोषण सुरू
मुक्ताराम बागुल, नांदगाव…
नासिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात असलेल्या जंक्शन रेल्वे स्टेशन म्हणून ओळखले जाणारे मनमाड शहरात अवैध धंद्याचा सुळसुळाट सुरू असून हे बंद करण्यात यावे या मागणीसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सेवाभावी संस्था महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष जयश्री कुणाल यांनी दिनांक मार्च 2025 रोजी सोमवारपासून रोज तीन तास उपोषण करण्याची संकल्पना घेऊन सुरुवात केली आहे.
सोमवार दिनांक 3 मार्च 2025 रोजी पासून सकाळी 11 वाजता उपोषणाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सेवाभावी संस्था महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष जयश्री कुणाल शिंदे यांनी रोज तीन तास उपोषण सुरू केले आहे त्यांनी उपोषण सुरू केल्यानंतर मनमाड शहरातील अवैध रीतीने चालणाऱ्या धंद्यांचा उघड सुरू असल्याने अनेक कुटुंबावर उपासमारीची वेळ आली असून अनेक संसार सुद्धा मोडले जात आहे. तसेच मनमाड शहरात नवीन पोलीस अधिकारी आल्यानंतर शहरातील सर्व जबाबदार व व्यापारी तसेच दोन नंबरचे अवैध धंदे करणारे मालक साहेबांचा सत्कार करतात आणि सत्कार करून काही चोरून लपवून आतून परवानगी घेतात तर काही त्यांना डोक्यावर बसून घेतात आणि तोच केलेला सत्कार नंतर होतो आणि त्याचे परिणाम समोर असे येतात की सर्व अवयव रितीने चालणारे दोन नंबरचे धंदे राजरोसपणे उघड बिंदास चालू होतात असेही मनमाड येथील बोलणारे बोलून जात आहेत.
तसेच मनमाड शहर नगर परिषदेत अशा अनेक प्रतिक्रिया आहेत की मनमाड नगरपरिषद मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब नसून ते एक हुकूमशाह असेच बोलले जात आहेत व नगरपरिषद कार्यालयातील प्रत्येक अधिकारी हा भ्रष्टाचारी आहे अशाच प्रतिक्रिया येत आहेत. नगरपरिषद ही सर्वात जास्त प्रमाणात निष्क्रिय नगरपरिषद आहे असेच बोलले जात आहे. तर काही असे बोलून जात आहे मनमाड नगरपरिषद विरोधात किती मूर्ती आंदोलन उपोषण ठिय्या आंदोलन करा काहीच होत नाही कुठली मागणी पूर्ण केली जात नाही. नगरपरिषद संबंधित अधिकारी मुख्याधिकारी उपोषण मोडून घेण्यासाठी तात्पुरते काही बिंदास लिहून देतात. कुपोषण सोडल्यानंतर मात्र त्याची दखल घेऊन ते मान्य केलेले कार्य करत नाहीत. मनमाड शहरात अनेक आंदोलन उपोषण झाले मात्र या कालादेखील न्याय मिळाला नाही. मनमाड नगर परिषद कार्यालयातील सर्व अधिकारी निष्क्रिय असून भ्रष्टाचार आहेत असे बोलणारे बोलून जात आहेत. अशी माहिती जयश्री कृणाल शिंदे यांनी दिली आहे. आता याकडे संबंधित विभागातील अधिकारी शासन व प्रशासन किती दखल घेणार याकडे मनमाड शहरातील नागरिकांचे लक्ष केंद्रित झाले आहे.
0
2
5
6
2
9