Breaking
क्रिडा व मनोरंजनमहाराष्ट्रसामाजिक

थिएटरमध्ये गाजणार ‘राजा शिवाजी’चा दमदार फर्स्ट लूक टीझर; ‘धुरंधर द रिव्हेंज’ सोबत खास सादरीकरण

0 4 6 2 0 8

स्वराज्याच्या गाथेची पहिली झलक! ‘धुरंधर द रिव्हेंज’सोबत थिएटरमध्ये येणार ‘राजा शिवाजी’चा फर्स्ट लूक टीझर

मुंबई, १८ मार्च २०२६: जिओ स्टुडिओज आणि मुंबई फिल्म कंपनी प्रस्तुत बहुप्रतिक्षित चित्रपट ‘राजा शिवाजी’ चा दमदार फर्स्ट लूक टीझर आता प्रेक्षकांसमोर येणार असून, हा खास अनुभव केवळ चित्रपटगृहांमध्येच पाहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे हा फर्स्ट लूक टीझर ‘धुरंधर-द रिव्हेंज’ या चित्रपटाच्या प्रदर्शनासोबत दाखवण्यात येणार आहे. त्यामुळे १८ मार्चपासून सुरू होणाऱ्या सशुल्क प्रिव्ह्यूद्वारेही प्रेक्षकांना या भव्य ऐतिहासिक चित्रपटाची पहिली झलक पाहण्याची संधी मिळणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची, स्वाभिमानाची आणि स्वराज्य स्थापनेच्या प्रवासाची सिनेमॅटिक झलक मोठ्या पडद्यावर नक्की बघा. रितेश विलासराव देशमुख यांची प्रमुख भूमिका असलेल्या आणि दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या चित्रपटात भारतातील एका महान योद्धाची गाथा , त्याचा स्वराज्य स्थापनेचा संघर्ष आता संपूर्ण जग या फर्स्ट लूक टीझर मधून बघेल.

या भव्य ऐतिहासिक कलाकृतीत संगीताची जादू अजय-अतुल यांनी दिली असून, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे छायाचित्रकार संतोष सिवन यांनी आपल्या अप्रतिम छायाचित्रणातून या गाथेला भव्य दृश्यरूप दिले आहे. भाषिक आणि भौगोलिक सीमा ओलांडत भारताचा समृद्ध इतिहास आणि वारसा जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा या चित्रपटाच्या निर्मात्यांचा उद्देश आहे.

जिओ स्टुडिओज प्रस्तुत आणि मुंबई फिल्म कंपनीच्या बॅनरखाली ज्योती देशपांडे आणि जिनिलीया देशमुख निर्मित ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट १ मे २०२६ रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार असून शौर्य, सन्मान आणि स्वराज्याच्या जन्मास भव्य आदरांजली अर्पण करणारी ही ऐतिहासिक गाथा प्रेक्षकांना एका विलक्षण सिनेमॅटिक प्रवासावर घेऊन जाणार आहे.

भव्यतेचा नवा अध्याय, इतिहासाची थरारक गर्जना भारतासह जगभरात गाजण्यासाठी भव्य पडद्यावर सज्ज झाली आहे…

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 6 2 0 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे