Breaking
ब्रेकिंगसत्कारसामाजिक

युनिटी फाउंडेशनकडून १०१ महिलांचा नारीशक्ती सन्मान

0 3 2 1 2 3

युनिटी फाउंडेशनकडून १०१ महिलांचा नारीशक्ती सन्मान

नाशिक: प्रतिनिधी

जागतिक महिला दिनानिमित्त नारीशक्ती सन्मान २०२५ चे नुकतेच युनिटी फाउंडेशनच्या संस्थापिका व अध्यक्षा एडवोकेट एकता प्रशांत कदम यांच्या वतीने तिसऱ्यांदा रामलीला लॉन्स जत्रा हॉटेल मुंबई आग्रा रोड नाशिक येथे आयोजन करण्यात आले.
या ठिकाणी सामाजिक. राजकीय. शैक्षणिक आणि आपल्या स्वतःच्या पायावर उभे राहून व्यवसाय करणाऱ्या १०१ महिलांचा व माजी केंद्रीय मंत्री भारतीताई पवार, अभिनेत्री सोनाली पाटिल तसेचस ह प्रायोजक भंडारी ज्वेलर्स मनमाडकरचे संचालक निर्मल भंडारी व एडव्होकेट दीप्ती गवळी यांच्यातर्फे सन्मान चिन्ह देऊन महिलांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी एडव्होकेट दीप्ती घनशाम गवळी, सोनी पैठणीचे संजय सोनी यांचे देखिल विशेष सहकार्य लाभले.पुरस्कार सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे माजी केंद्रीय मंत्री भारतीताई पवार आणि बिग बॉस सीजन थ्रीच्या सेलिब्रिटी सोनाली पाटील तसेच इतर मान्यवरांमध्ये बन्सी ढेरे कुटे,गायत्री भामरे,शितल विसावे,मॉडेल एक्टर्समध्ये मनाली पवार,संदेशा पाटील,ऋषी जोरावर,खानदेशी सॉंगचे डायरेक्टर सतीश बैरागी आणि कार्यक्रमासाठी वीरेंदर कौर,योगिता निकम,नीलम साठे,ज्योसना महाजन,रूपाली वालझाडे आरती जैन यांचे विशेष सहकार्य लाभले.
कार्यक्रमाचे समारोप करताना युनिटी फाउंडेशनच्या संस्थापिका व अध्यक्षा ॲड.एकता कदम यांनी सगळ्याचे आभार मानत महिलाचा हिताचा विचार आमच्या संस्थेतून केला जाईल असे आश्वासन दिले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 2 1 2 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे