लासलगाव पोलिसांनी जप्त केली कत्तलीसाठी जाणारी 6 गोवंश जनावरे
पीकअप सह 2 लाख 65 हजारांचा मुद्देमाल जप्त
शरद लोहकरे, लासलगाव -:
सोमवार दि. 9 डिसें रोजी रात्री 2.30 वाजेच्या दरम्यान लासलगाव पोलिसांनी पाठलाग करीत कत्तलीसाठी जाणारे सहा जनावरे व एक पिकअप असा 2 लाख 65 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून अज्ञात आरोपींच्या विरोधात महाराष्ट्र पशु संरक्षण कायदा व प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लासलगाव पोलीस ठाण्यात पो.शि.अविनाश सांगळे यांनी दिलेल्या फिर्यादीत, मी विंचुर गावात पेट्रोलिंग करीत असतांना रात्री 1.45 वा.चे सुमारास स.पो.नि.भास्कर शिदे यांनी मला फोन करुन निफाड ते विंचुर रस्त्यानेएक इसम हा त्याचेकडील पिकअप गाडीमध्ये गायी व बैल गोवंश जातीची जनावरे कत्तल करण्याचे उद्देशाने घेवुन जाणार आहेत. तरी तुम्ही त्याबाबत माहीती घेवुन कारवाई करा असे कळवल्याने पो.शि.शशिकांत निकम, पो.शि.सागर आरोटे, गोपनीय शाखेचे अंमलदार पो.शि. सुजय बारगळ यांचेसह पो.उ.नि.मारुती सुरासे, पो.शि.चंदू मांजरे यांना फोन करुन त्यांना विंचुर दुरक्षेत्र येथे बोलावून निफाड विंचुर रस्त्यावर जागोजागी थांबलो. रात्री 2.30 वाजेच्या सुमारास आम्ही हॉटेल आनंद समोर उभे असतांना आम्हाला निफाड ते विंचुर रस्त्यावर एम.एच.15 जी.आर.5316 ही पिकअप दिसली. ती आम्ही थांबण्याचा प्रयत्न केला असता चालकाने पुढे उभी करून आमच्या पाठलागानंतरही अंधाराचा फायदा घेऊन शेतात पळून गेला.
सदर गाडीत गोवंश जातीच्या तीन जर्शी व एक गावठी अशा चार गायी, एक वासरी, दोन गोर्हे हे निर्दयपणे त्यांना यातना, इजा होईल अशा पद्दतीने दोरीच्या सहाय्यानेआखुड बांधुन ठेवलेले दिसले. तेव्हा आमची खात्री झाली की, सदरच्या वाहनावरील चालक हा वाहनामधील जनावरे हि कत्तल करण्याचे उद्देशाने विना परवाना वाहतुक करताना मिळुन आले म्हणुन अज्ञात चालकाविरुद्द गु.रजि. क्रमांक 313/2024 प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम 1960 11(1), (अ)(ब), महाराष्ट्र पशु संरक्षण कायदा, 1976 5 अ(1) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून स.पो.नि.भास्कर शिंदे यांचे मार्गदर्शनाखालीपो.हवा.रामनाथ घुमरे अधिक तपास करीत आहेत.