Breaking
क्रिडा व मनोरंजन

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन सादर करत आहे ‘‘पुकार – दिल से दिल तक’

प्रेम, हरपण्या-गवसण्याची एक वेधक कहाणी

0 1 5 1 1 9

मुंबई – आपल्या मनोरंजक मालिकांच्या संचात राजस्थानची चमकदार छटा मिसळत सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन सादर करत आहे नवी मालिका ‘पुकार – दिल से दिल तक’. या वेधक मालिकेत एका कुटुंबाने आपल्या दुरावलेल्या सदस्यांना घातलेली साद आहे. आकर्षक महिला व्यक्तिरेखांनी नटलेल्या या मालिकेचे कथानक उत्कंठावर्धक आहे. ‘पुकार – दिल से दिल तक’ मालिका को-पॉवर्ड बाय फॉर्च्यून प्रीमियम कच्ची घानी प्योर मस्टर्ड ऑइल, मालिका 27 मे 2024 पासून दर सोमवार ते शुक्रवार रात्री 8:30 वाजता प्रसारित करण्यात येईल.

गुलाबी शहर जयपूरच्या पार्श्वभूमीवर बेतलेल्या या मालिकेच्या कथानकात प्रेमाचे, दुरावण्याचे आणि गवसण्याचे धागे गुंफले आहेत. ही एका उद्ध्वस्त झालेल्या आईची, सरस्वतीची (सुखदा खांडकेकर) कहाणी आहे. आपल्या हरवलेल्या दोन मुली वेदिका (सायली साळुंखे) आणि कोयल (अनुष्का मर्चंडे) यांना शोधून पुन्हा एकत्र आणण्याची तिची आशा दुर्दम्य आहे. एका दुर्दैवी अपघाताने दुरावलेल्या सरस्वती, वेदिका आणि कोयलचे मार्ग नकळतपणे अनपेक्षित परिस्थितीत पुन्हा एकत्र येतील आणि मग त्यांना त्यांच्या कुटुंबाची वाताहत करणाऱ्या राजेश्वरी महेश्वरी (सुमुखी पेंडसे) या खलनायिकेचा एकजुटीने सामना करावा लागेल.

‘पुकार – दिल से दिल तक’ मालिकेच्या मुळाशी आहे एक आई आणि तिच्या मुलींशी असलेले तिचे घट्ट नाते आणि दुसरीकडे एका व्यवसाय कुटुंबातील पाताळयंत्री स्त्रीने अधिकाराचा गैरवापर करून केलेली कारस्थाने! कौटुंबिक नात्यातील गुंतागुंत आणि कोणत्याही अडचणींवर मात करण्याची प्रेमाची ताकद दर्शवणाऱ्या या मालिकेत सरस्वती आणि तिच्या मुलींना सगळ्या प्रतिकूलतांना तोंड देत एकजुटीने उभे राहावे लागणार आहे आणि हे सिद्ध करावे लागणार आहे की, कुटुंबाला एकत्र बांधणारे धागे किती मजबूत असतात!

‘पुकार – दिल से दिल तक’ सुरू होत आहे 27 मे 2024 रोजी आणि दर सोमवार ते शुक्रवार रात्री 8:30 वाजता प्रसारित करण्यात येईल सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरून!

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 5 1 1 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे