जागतिक शांततेसाठी भगवान महाविरांच्या विचारांची आवश्यकता- मंत्री छगन भुजबळ
मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते विंचूर येथील जैन स्थानकाचे उद्घाटन
विंचूर दि.२ (प्रतिनिधी)
अतिप्राचीन धर्म असलेला जैन धर्म हा लोकशाही विचार मूल्य असलेला भारतातील महत्त्वाचा धर्म आहे. या धर्माने समता, स्वातंत्र्य आणि न्याय या विचारांचा पुरस्कार केलेला आहे. या धर्माचे तीर्थंकर भगवान महावीर यांनी शांतता आणि अहिंसेचा संदेश दिला आहे. त्यांच्या या विचाराचा अवलंब केला तर जगभरात शांतता प्रस्थापित होईल असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले. विंचूर येथे जैन स्थानकाचे मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते आज उद्घाटन करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी उपस्थितांना संबोधित करताना ना.भुजबळ यांनी जैन धर्माचे मुख्य प्रार्थना स्थळ म्हणून जैन स्थानकाकडे बघितले जाते. या धार्मिक स्थळातून ऊर्जा घेऊन समाजसेवेचे काम करावे. समकालीन जागतिक परिस्थितीच्या संदर्भात जैन धर्माचे सिद्धांत अतिशय समर्पक आहेत. जैन धर्माच्या शिकवणी मुळे आपण समाजात आणि जगात शांतता व एकोपा परत आणू शकतो असे प्रतिपादन केले.
यावेळी व्यासपीठावर जैन साध्वी प.पु.मधुस्मिताजी, प.पु.ज्ञानप्रभाजी, प.पु. भावप्रितीजी, प.पू. अर्चनाजी, सोहनलाल भंडारी, प्रकाश दायमा, सरपंच सचिन दरेकर होते.
पुढे बोलताना भुजबळ यांनी अतिप्राचीन धर्म असलेला जैन धर्म हा लोकशाही विचार मूल्य असलेला भारतातील महत्त्वाचा धर्म आहे. या धर्माने समता, स्वातंत्र्य आणि न्याय या विचारांचा पुरस्कार केलेला आहे. या धर्माचे तीर्थंकर भगवान महावीर यांनी जगाला शांतता आणि अहिंसेचा संदेश दिला आहे. त्यांच्या या विचाराचा अवलंब केला तर जगभरात शांतता प्रस्थापित होईल असे उद्गार काढले.
यावेळी नितीन जैन, बालचंदजी बोथरा , नंदकुमार चोरडिया, कैलास सोनवणे, ज्ञानेश्वर महाराज, सुनील मालपाणी, राजाराम दरेकर, निरज भट्टड, कुणाल दराडे, शिवा सुराशे, पांडुरंग राऊत, विलास गोरे, जयंत साळी, महेंद्र पुंड, इस्माईल मोमीन, शंकरलाल सोनी, राहुल संघवी, संजय गग्गड, संतोष सोनी, अतुल दुसाने, अक्षय सोनी, अमित बोथरा, राहुल संघवी, दिलीप बोथरा, दिलीप m सोनी, दिलीप r सोनी, सतिष कांकरिया, राजेंद्र बोथरा, ललित सोनी, संजय सोनी, मनोज सोनी, आदींसह जैन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.