दरवर्षी २६ जूनला जगभर आंतरराष्ट्रीय नशा निरोधक दिवस साजरा केल्या जातो.नशेली वस्तुंचे निवारण व्हावे या उद्देशाने संयुक्त राष्ट्र महासभेने ७ डिसेंबर १९८७ ला एक प्रस्ताव पारित केला व त्या अनुषंगाने युनोने १९८८ पासून दरवर्षी नशेली पदार्थांच्या सेवनाने होणाऱ्या दुष्परिणामाच्या प्रती समाजात जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने दरवर्षी २६ जूनला आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिवस म्हणून साजरा केल्या जातो.सध्याच्या आधुनिक युगात नशेच्या सेवनाचे प्रमाण वाढल्याने नशेली पदार्थांचा वाममार्गाने मोठा व्यापार आपल्याला दिसुन येतो. कोणतीही नशा असो शरिराला व आयुष्याला घातकच आहे.कारण नशा हा शब्दच असा आहे की प्रत्येकांचे आयुष्य उद्ध्वस्त करतो मग ती कोणतीही नशा असो.त्यामुळे आजच्या युवा पिढीने नशेली पदार्थांपासून सावधान रहाणे अत्यंत गरजेचे आहे.कारण नशेली वस्तू युवावर्गापर्यत पोहोचविण्याचे काम तस्करीच्या माध्यमातून केले जाते.भारतात बांगलादेश, पाकिस्तान, नेपाळ,ईरान, अफगाणिस्तान मार्गे विदेशी तस्कर नशेली पदार्थ पुरविण्याचे काम करीत असतात.ड्रग्स पुरवठ्याचे जाळे तस्करीच्या माध्यमातून संपूर्ण जगभर विनल्या गेले आहे.भारतार दर महिन्याला अवैधरित्या आलेली करोडो रुपयांची ड्रग्स पकडली जाते.तरीही युवावर्गामध्ये नशेचे प्रमाण अजूनही कमी झालेले नाही ही अत्यंत गंभीर व चिंताजनक बाब आहे.नुकतेच २२ जून २०२४ ला गुजरातच्या समुद्र किनाऱ्यावर बीएसएफ जवानांनी १५० करोड रुपयांची ड्रग्स पकडली ही ड्रग्स कच्छच्या क्रिक भागात लावारिस पडलेली सापडली. सरकारी माहितीनुसार या ड्रग्सचे तार ईरान व अफगाणिस्तानशी असल्याचे सांगितले जाते.यावरून स्पष्ट होते की काही विदेशी असामाजिक तत्व भारतीय युवा पिढीला नेशेच्या खाईत लोटण्याचे काम करीत आहे.त्यामुळे आजच्या तरुण पिढीने व युवा वर्गाने नशेली पदार्थांपासून सावध रहाने अत्यंत गरजेचे आहे.कारण कोणतीही नशा ही महाघातक असते. कोणत्याही नशेपासुन शरिराला यत्किंचितही लाभ होत नाही उलट त्याचे शरिरावर व परिवारावर मोठ्या प्रमाणात दुष्परिणाम होतांना दिसतात. सध्याच्या परिस्थितीत हॉटेलमध्ये सुध्दा ड्रग्सचा पुरवठा होतो हे नुकत्याच एका पुण्याच्या हॉटेलवरून लक्षात आले आहे.त्यामुळे ते हॉटेल प्रशासनाकडुन सील करण्यात आले आहे.अशाच पध्दतीने पबमध्ये सुद्धा ड्रग्सचा गोरखधंदा चालत असावा याला सुध्दा नाकारता येत नाही.यावर प्रशासनाने लक्ष केंद्रित केले पाहिजेत.देशात नशेली पदार्थांवर प्रतीबंध आहे. परंतु तस्करीच्या माध्यमातून अफीम, गांजा, भांग, कोकेन,हेरोइन सारखे अंमली पदार्थ युवा पिढीपर्यंत वाममार्गाने पोहचवु त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याचे काम असामाजिक तत्व वेळोवेळी करीत असतात.परंतु आजचा युवावर्ग जागृक आहे त्यांनी प्रत्येक नशेली पदार्थांपासून सावध रहाले पाहिजे व त्याचा कडाडून विरोध करायला पाहिजे. देशासह जगातील युवावर्गाने २६ जूनला शपथ घेतली पाहिजे की मी माझ्यासाठी, माझ्या परिवारासाठी व देशाच्या भविष्यासाठी यापुढे कोणतीही नशा करणार नाही तेव्हाच खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिवस समजल्या जाईल.कारण ड्रग्सची नशा ही नशा करणाऱ्यांचे आयुष्याची छल्ली तर करतोच सोबतच परिवाराला असमंनजस्यतेमध्ये टाकुन संपूर्ण परिवार विस्कळीत होतो. यामुळे संपूर्ण घर उध्वस्त होते याचे मुख्य कारण म्हणजे फक्त नशा.त्यामुळे कोणतीही नशा म्हणजे आयुष्याचा शेवट ही बाब सर्वांनीच लक्षात ठेवली पाहिजे.कोणतीही नशा असो ती शरीराचा विकास तर करीत नाहीच हालाकी शरिराला “छल्ली” व छिन्नविछिन्न करण्याचे काम करीत असते व स्लोपॉयझनचे काम करून मृत्युला जवळ करीत असते.आपण साधारणतः नशेली वस्तू व पोषक वस्तू यांचा विचार केला तर मनुष्यासाठी नशेली वस्तूंच्या तुलनेत पोषक वस्तू खुपचं स्वस्त असतात. त्यामुळे नशा करणाऱ्यांनी मनावर ताबा ठेवुन नशेली पदार्थांचा विरोध करावा व युवकांनीच जगाला संदेश देवुन नशेली पदार्थांचा निषेध केला पाहिजे. कोणत्याही नशेली वस्तुंसाठी रांगेत उभे रहाने म्हणजे “मृत्यूच्या रांगेत”उभे रहाल्यासारखे आहे. याची जानीव आजच्या युवा पिढीने लक्षात ठेवली पाहिजे. कोणीही कीतीही नशेली वस्तु देण्याचा प्रयत्न केला तरीही आपण जर आपल्या मनावर ताबा ठेवला तर कोणतीही नशेली वस्तु तुम्हाला स्पर्शसुध्द करू शकत नाही हेसुद्धा तेवढेच सत्य आहे.त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत प्रत्येकांनी आपल्या आयुष्याची काळजी घ्यायला हवी.त्यामुळे कोणत्याही नशेपासुन सावधगिरी बाळगली पाहिजे.आपण सुदृढ रहालो तर आपली पिढी सुदृढ राहील” त्याचप्रमाणे “आपण सुरक्षीतरीत्या जगलो तर तर देश सुरक्षित राहील, देश सुरक्षित रहाला तर जग अवश्य सुरक्षित होईल.याकरीता अंमली पदार्थ विरोधी दिनाच्या निमित्ताने आपण “संकल्प” करूया की नशेली वस्तूला टाटा-बाय-बाय करू या.
0
1
5
1
2
1
0
1
5
1
2
1