राजापूरचा युवक बनला मुंबई ला अधीक्षक
ग्रामस्थांनी केला सत्कार

राजापूर येथील नवनाथ दत्तू वाघ यांची कार्यालय अधीक्षक पदाला गवसणी
लक्ष्मण घुगे राजापूर प्रतिनिधी
येवला तालुक्यातील डोंगराळ भागात असलेल्या राजापूर येथील होतकरू तरुण नवनाथ दत्तू वाघ यांची मुंबई सी एस टी रेल्वे कार्यालय अधीक्षक पदाला गवसनी घातली आहे. राजापूर येथील आई वडील दररोज मोल मजुरी करून आपला संसाराचा गाडा चालवत आपल्या मुलाचं शिक्षण पुर्ण केले पुढे मुलाने आपल्या आई वडील दररोज मोल मजुरी करतात हि जिद्द चिकाटी मनी बाळगून अभ्यास करून रेल्वेत कार्यलय अधिक्षक पदाला गवसनी घातली आहे. नवनाथ वाघ हा कुटुंबातील पहिला सरकारी नोकरी लागली असल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक केले जाते आहे. राजापूर ग्रामपंचायत येथे त्यांचा मोठ्या उत्साहात सत्कार करण्यात आला राजापूर ग्रामपंचायतचे सरपंच अलका दामू सोनवणे, माजी उपसरपंच सुभाष वाघ, दत्ता सानप, दिनेश आव्हाड , आण्णासाहेब मुंडे, येवला तालुका खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन लक्ष्मण घुगे, संजय भाबड, पप्पू बोडके, साहेबराव नागरे, शिवाजी आव्हाड, अनिल अलगट, गजू भाबड , विनायक आव्हाड ,प्रवीण नागरे , भाऊसाहेब बैरागी, गणेश भाबड राहुल कासार, मंगेश वाघ ,सचिन जाधव, प्रवीण जाधव , विलास भालके, नवनाथ तळेकर, आदी ग्रामस्थांनी शाल श्रीफळ देऊन सत्कार केला .