Breaking
ब्रेकिंग

हृदयविकारांच्या अचूक निदानासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची साथ; IVUS, FFR आणि OCT मुळे उपचार अधिक सुरक्षित व परिणामकारक

0 4 7 3 9 4

हृदयविकारांच्या अचूक निदानासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची साथ; IVUS, FFR आणि OCT मुळे उपचार अधिक सुरक्षित व परिणामकारक

नाशिक : – भारतामध्ये हृदयविकार हे मृत्यूचे एक प्रमुख कारण बनले असून, बदलती जीवनशैली, वाढता ताणतणाव, मधुमेह, उच्च रक्तदाब, धूम्रपान, वाढलेले कोलेस्टेरॉल आणि लठ्ठपणा यामुळे हृदयाच्या रक्तवाहिन्यांमधील ब्लॉकेजचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत हृदयविकाराचे केवळ निदान नव्हे, तर ब्लॉकेजची अचूक तीव्रता आणि त्याचा हृदयाच्या कार्यावर होणारा परिणाम समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. आधुनिक इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजीमधील अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे हे शक्य झाले असून रुग्णांना अधिक सुरक्षित, अचूक आणि प्रभावी उपचार मिळत आहेत.

याबाबत माहिती देताना डॉ. सुधीर शेतकर, वरिष्ठ इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट, अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल, नाशिक यांनी सांगितले की, “पूर्वी हृदयाच्या रक्तवाहिन्यांमधील ब्लॉकेजचे मूल्यांकन प्रामुख्याने अँजिओग्राफीच्या आधारे केले जात होते. मात्र काही वेळा अँजिओग्राफीमध्ये दिसणारे ब्लॉकेज आणि प्रत्यक्षात हृदयाच्या रक्तपुरवठ्यावर होणारा परिणाम यामध्ये फरक असू शकतो. त्यामुळे आज IVUS, FFR आणि OCT यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जात आहे.”

ते पुढे म्हणाले, “IVUS (Intravascular Ultrasound) या तंत्रज्ञानाद्वारे रक्तवाहिनीच्या आतील भागाचे अल्ट्रासाऊंडच्या सहाय्याने सविस्तर चित्र मिळते. त्यामुळे ब्लॉकेजचे स्वरूप, त्याची लांबी, तीव्रता आणि रक्तवाहिनीचा अचूक आकार समजतो. यामुळे योग्य आकाराचा स्टेंट निवडणे आणि त्याचे अचूक प्रत्यारोपण करणे शक्य होते, ज्यामुळे उपचारांचे यशस्वी प्रमाण वाढते.”

FFR (Fractional Flow Reserve) विषयी माहिती देताना डॉ. शेतकर म्हणाले, “अनेक वेळा अँजिओग्राफीमध्ये मध्यम स्वरूपाचे ब्लॉकेज दिसते, परंतु त्या ब्लॉकेजमुळे प्रत्यक्षात हृदयाच्या रक्तपुरवठ्यावर किती परिणाम होत आहे हे निश्चित सांगता येत नाही. अशा वेळी FFR चाचणी अत्यंत उपयुक्त ठरते. या चाचणीद्वारे ब्लॉकेजचा रक्तपुरवठ्यावर होणारा परिणाम मोजता येतो. त्यामुळे ज्या रुग्णांना प्रत्यक्षात स्टेंटची आवश्यकता नाही, त्यांच्यामध्ये अनावश्यक अँजिओप्लास्टी टाळता येते.”

OCT (Optical Coherence Tomography) या तंत्रज्ञानाबाबत बोलताना त्यांनी सांगितले, “OCT हे अत्यंत प्रगत इमेजिंग तंत्रज्ञान असून रक्तवाहिनीच्या आतील भागाचे अतिशय स्पष्ट आणि सूक्ष्म चित्र उपलब्ध करून देते. त्यामुळे प्लॅकचे स्वरूप, स्टेंटची अचूक स्थिती आणि उपचारांनंतरचे परिणाम अधिक प्रभावीपणे तपासता येतात. जटिल आणि उच्च जोखमीच्या अँजिओप्लास्टीमध्ये OCT अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते.”

डॉ. शेतकर यांनी पुढे सांगितले की, आधुनिक इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजी केवळ साध्या अँजिओप्लास्टीपुरती मर्यादित राहिलेली नाही. Rotablation, Intravascular Lithotripsy (IVL), Left Main Angioplasty, Complex Coronary Interventions, High-Risk Angioplasty यांसारख्या अत्याधुनिक उपचारपद्धतींमुळे पूर्वी अत्यंत गुंतागुंतीचे समजले जाणारे अनेक रुग्ण आज यशस्वीरित्या उपचार घेऊ शकत आहेत.

“आज उपचारांचा उद्देश केवळ ब्लॉकेज उघडणे नसून रुग्णाला दीर्घकालीन सुरक्षित आणि उत्तम जीवनमान मिळवून देणे हा आहे. IVUS, FFR आणि OCT सारख्या तंत्रज्ञानामुळे उपचारांची अचूकता, सुरक्षितता आणि यशाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे रुग्णांना अधिक चांगले आणि दीर्घकालीन परिणाम मिळतात,” असे डॉ. शेतकर यांनी नमूद केले.

अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक Cath Lab, IVUS, FFR, OCT तसेच जटिल अँजिओप्लास्टीसाठी आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध असून, नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रातील रुग्णांना महानगरांप्रमाणेच जागतिक दर्जाचे हृदयरोग उपचार स्थानिक पातळीवर उपलब्ध होत आहेत.

विशेष म्हणजे, हृदयविकाराशी संबंधित अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी तसेच इतर अनेक कार्डियाक उपचार महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना (MJPJAY) अंतर्गत पात्र रुग्णांसाठी पूर्णपणे मोफत उपलब्ध आहेत. त्यामुळे आर्थिक कारणांमुळे उपचारांमध्ये होणारा विलंब टाळून रुग्णांना वेळेवर आणि दर्जेदार उपचार मिळणे शक्य होत आहे.

“हृदयविकाराचे लवकर निदान, नियमित आरोग्य तपासणी आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने केलेले अचूक उपचार हेच निरोगी हृदयाचे गमक आहे. छातीत दुखणे, धाप लागणे, थकवा किंवा इतर हृदयविकाराची लक्षणे आढळल्यास त्वरित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा,” असे आवाहन डॉ. सुधीर शेतकर यांनी केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 7 3 9 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे