ब्रेकिंग
किम्स मानवता हॉस्पिटल तर्फे नाशिक सायकलिस्टना आरोग्यविषयक बीएलएस-सीपीआर प्रशिक्षण
0
4
2
9
5
7
नाशिक, : आरोग्य, फिटनेस आणि सुरक्षिततेचा संदेश देणाऱ्या उपक्रमांतर्गत नाशिक सायकलिस्ट फाउंडेशन तर्फे किम्स मानवता हॉस्पिटल व एचसीजी मानवता कॅन्सर सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य चर्चासत्र आणि बीएलएस-सीपीआर ट्रेनिंग चे आयोजन रुद्र हॉल, मानवता कॅम्पस, मुंबई नाका, नाशिक येथे करण्यात आले.
या कार्यक्रमात सायकलिंगप्रेमी तसेच आरोग्याबाबत सजग नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत हृदय, मेंदू व सांध्यांच्या आरोग्याविषयी मौल्यवान माहिती मिळवली. तसेच, बेसिक लाईफ सपोर्ट (BLS) आणि सीपीआर (CPR) या जीवनरक्षक तंत्रांचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक सुद्धा घेण्यात आले.
कार्यक्रमास प्रा. डॉ. राज नगरकर, मॅनेजिंग डायरेक्टर , किम्स मानवता हॉस्पिटल, श्री. हरीश बैजाल, निवृत्त आयपीएस अधिकारी व संस्थापक – नाशिक सायकलिस्ट फाउंडेशन तसेच श्री. अमित घुगे, अध्यक्ष – नाशिक सायकलिस्ट फाउंडेशन उपस्थित होते.
या प्रसंगी तज्ज्ञ डॉक्टरांनी मार्गदर्शन केले डॉ. प्रणित सोनवणे , रोबोटिक्स नी रिप्लेसमेंट सर्जन व स्पोर्ट्स मेडिसिन स्पेशालिस्ट यांनी “Strong Knees, Strong Cycling: आधुनिक उपाय सांध्यांच्या आरोग्यासाठी” या विषयावर व्याख्यान दिले.डॉ. अतुल पाटील, वरिष्ठ इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट यांनी “Keeping Your Heart Healthy for the Long Ride” या विषयावर मार्गदर्शन केले. डॉ. निनाद थोरात, वरिष्ठ न्युरोलॉजिस्ट यांनी “Brain Health and Stroke Awareness for Every Age” या विषयावर माहिती दिली.
या उपक्रमाद्वारे सहभागींच्या आरोग्याबाबतची जागरूकता वाढवण्याबरोबरच प्रत्येकाने जीवनरक्षक तंत्र आत्मसात करून “एव्हरीडे हिरो” बनण्याचा संदेश देण्यात आला. कार्यक्रमात किम्स मानवता फॅमिली हेल्थ कार्डचे लोकार्पण करण्यात आले. या कार्डअंतर्गत नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनच्या सदस्यांसाठीप्रिव्हेंटिव हेल्थ चेकअप प्लॅन आणि विशेष सवलतींचे फायदे उपलब्ध करून देण्यात आले.
कार्यक्रमाचा समारोप आभारप्रदर्शन व अल्पोपहाराने झाला. या उपक्रमाद्वारे किम्स मानवता हॉस्पिटल आणि नाशिक सायकलिस्ट फाउंडेशन यांनी “आरोग्यदायी, सुरक्षित आणि जागरूक समाज” घडवण्याचा संदेश दिला.
0
4
2
9
5
7


