*राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या लासलगाव शहराध्यक्षपदी धर्मेश जाधव
*राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या लासलगाव शहराध्यक्षपदी धर्मेश जाधव यांची नियुक्ती*
*आमदार पंकज भुजबळ यांच्या हस्ते नियुक्ती पत्र प्रदान*
*नाशिक,दि.२६ ऑक्टोबर :-* भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, आरपीआय आठवले महायुती घटक पक्षांचे उमेदवार मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत मनसे उपजिल्हा प्रमुख धर्मेश जाधव यांनी नुकताच राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला. आज लासलगाव गणेश नगर येथे आमदार पंकज भुजबळ यांच्या हस्ते धर्मेश जाधव यांना राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या वतीने नियुक्तीपत्र प्रदान करत लासलगाव शहराध्यक्ष पदाची महत्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
यावेळी मंत्री छगन भुजबळ यांनी येवला मतदारसंघात अनेक महत्वपूर्ण विकासकामे केली आहे. मतदारसंघात त्यांनी केलेल्या विकासामुळे येवला मतदारसंघाला राज्यात वेगळी ओळख निर्माण झाली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज मला लासलगाव शहराध्यक्ष पदाची महत्वाची जबाबदारी देण्यात आली. या निवडणुकीत आपण निवडणुकीत अधिक जोमाने काम करत लासलगाव परिसरातून अधिक मताधिक्य मिळवून देण्यासाठी पूरेपर प्रयत्न करू तसेच पक्षाचे ध्येय धोरणे जनतेपर्यंत पोहोचवू असे धर्मेश जाधव यांनी यावेळी सांगितले. तसेच मंत्री छगन भुजबळ यांनी शहराध्यक्षपदाची जबाबदारी दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले.
यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष पंढरीनाथ थोरे, डि.के.जगताप, सुवर्णाताई जगताप, तालुकाध्यक्ष भाऊसाहेब भवर, डॉ.श्रीकांत आवारे, मंगेश गवळी, दत्तात्रय रायते, दत्तूपंत डुकरे, सचिन दरेकर, विलास गोरे, डॉ.प्रताप पवार, राजेंद्र चाफेकर, बबन शिंदे, डॉ.वैशाली पवार, सुलभा वरे, पांडुरंग राऊत, राहुल डुंबरे, माधव जगताप यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.