Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरब्रेकिंगशैक्षणिकसामाजिक

विंचूरच्या क. भा. पाटील विद्यालयात छत्रपती राजर्षी शाहू महाराजांना अभिवादन!

0 3 2 9 4 9

विंचूरच्या क. भा. पाटील विद्यालयात छत्रपती राजर्षी शाहू महाराजांना अभिवादन!

विंचूर – गुरुवार दि.26 जून 2025 रोजी कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय व कला,विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात छत्रपती राजर्षी शाहू महाराज जयंती कार्यक्रम साजरा करण्यात आला. सर्वप्रथम महाराजांच्या प्रतिमेचे पूजन प्रमुख मान्यवरांचे हस्ते करण्यात आले. विद्यालयाचे प्राचार्य नंदकुमार देवढे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
सदर कार्यक्रमात अनुकल्प वानखडे, दिशा निकम, विदया, तेजस्विनी चव्हाण, कुणाल, अंतिक्षा, यश, तनुष्का, दिशा, या इ.8वी क च्या विद्यार्थ्यांनी शाहू महाराजांचे शैक्षणिक व सामाजिक कार्य विषयी आपले मनोगत व्यक्त केले.
शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष नंदकुमार देवढे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून,समतेचा दीप प्रज्वलित करणारे,शिक्षणाचा मंत्र देणारे,अस्पृश्यतेवर प्रहार करून, मानवतेची मशाल घेऊन चालणारे राजे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचा आदर्श विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात घ्यावा असे सांगितले. सदर कार्यक्रम इ.8वी च्या विद्यार्थ्यांनी घडवून आणला. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन त्रिवेणी वाडेकर व आभार अस्मिता आघाव यांनी मानले.
सदर कार्यक्रमाप्रसंगी, विद्यालयाचे उपमुख्याध्यापक सुरेश वाबळे, पर्यवेक्षक सुदामराव माळी, राजेंद्र चांदे लाईफ मेंबर रयत शिक्षण संस्था सातारा, ज्युनियर विभागाचे प्राध्या. राजेंद्र टिळेकर,किशोर पाटील, तसेच विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक अरुण साळुंके , प्रशांत कोळी, वीरेंद्र कांबळे, विद्या कुलकर्णी तसेच विद्यालयातील सर्व विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 2 9 4 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे