Breaking
ब्रेकिंग

​कळवण उपजिल्हा रुग्णालयात गरोदर महिलेचा मृत्यू; डॉक्टर-कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणाचा आरोप करत नातेवाईकांचा संताप*

0 4 5 5 0 9

*​कळवण उपजिल्हा रुग्णालयात गरोदर महिलेचा मृत्यू; डॉक्टर-कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणाचा आरोप करत नातेवाईकांचा संताप*

*​दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी; वैद्यकीय अधीक्षक गैरहजर असल्याने खळबळ*

 दिपक बागुल, कळवण (प्रतिनिधी):

कळवण उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय यंत्रणेचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. एका ३१ वर्षीय गरोदर महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज घडली असून, डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच हा बळी गेल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. या प्रकरणी दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली असून परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, बागलाण तालुक्यातील तताणी येथील संगीता पवार (वय ३१) या गरोदर महिलेला १६ एप्रिल रोजी कळवण उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गुरुवारी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास त्यांना प्रसूती कळा सुरू झाल्यानंतर डॉ. नीलिशा मोरे यांनी सिझेरियन शस्त्रक्रिया केली. सुरुवातीला प्रसूती यशस्वी झाल्याचे सांगण्यात आले होते.

​प्रकृती खालावली, तरीही हलविण्यास विरोध?

​आज शुक्रवार, १७ एप्रिल रोजी सकाळी संगीता यांची प्रकृती अचानक खालावली. प्रकृती चिंताजनक होत असल्याचे पाहून नातेवाईकांनी त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात हलवण्याची विनंती डॉक्टरांकडे केली होती. मात्र, रुग्णालय प्रशासनाने काही तांत्रिक कारणास्तव त्यांना बाहेर हलवण्यास विरोध दर्शवला आणि येथेच उपचार सुरू ठेवले. अखेर सकाळी ११ वाजेच्या सुमारास उपचारादरम्यान संगीता यांचा मृत्यू झाला.

*नातेवाईकांचे गंभीर आरोप:*

​साहित्य बाहेरून आणण्यास सक्ती: उपजिल्हा रुग्णालय असूनही सिझेरियनसाठी लागणारे सर्जरीचे साहित्य बाहेरून विकत आणायला लावल्याचा गंभीर आरोप नातेवाईकांनी केला आहे.

*​वैद्यकीय अधीक्षकांची अनुपस्थिती:* एवढी मोठी घटना घडली असताना रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रशांत पाटील हे कर्तव्यावर गैरहजर होते. ते दुपारी १ वाजता रुग्णालयात पोहोचल्याने नातेवाईकांचा संताप अनावर झाला.

*​कर्मचाऱ्यांची मनमानी:*

 वरिष्ठांचा वचक नसल्याने कर्मचारी मनमानी करतात आणि रुग्णांच्या जीवाशी खेळतात, अशी भावना संतप्त नातेवाईकांनी व्यक्त केली.

*​”रुग्णालय प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे आम्ही आमची माणसे गमवायची का?*

 जोपर्यंत दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही.”

— मयत महिलेचे संतप्त नातेवाईक

​प्रशासकीय कारवाई काय?

​घटनेनंतर रुग्णालय परिसरात मोठा जमाव जमला होता. पोलीस निरीक्षक खगेंद्र टेंबेकर यांनी तातडीने पथकासह रुग्णालयात धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रशांत पाटील यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आश्वासन दिले आहे. सध्या मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून, अहवालानंतर नेमका मृत्यू कशामुळे झाला हे स्पष्ट होईल.

​ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेचा आधार असलेल्या उपजिल्हा रुग्णालयात अशा प्रकारे ‘बळी’ जाण्याच्या घटनांमुळे आरोग्य व्यवस्थेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 5 5 0 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे