Breaking
कृषीवार्ता

क्रिस्टल क्रॉप प्रोटेक्शनकडून खरीप २०२६ साठी सहा अत्याधुनिक कृषी नवकल्पना सादर

0 4 9 3 1 0

*क्रिस्टल क्रॉप प्रोटेक्शनकडून खरीप २०२६ साठी सहा अत्याधुनिक कृषी नवकल्पना सादर*

*मुंबई :* भारतीय शेतीसमोरील हवामानातील अनिश्चितता, कीटक व रोगांचे बदलते स्वरूप आणि वाढत्या उत्पादकतेच्या गरजा लक्षात घेऊन क्रिस्टल क्रॉप प्रोटेक्शन लिमिटेडने खरीप २०२६ हंगामासाठी सहा अत्याधुनिक कृषी उत्पादने सादर केली आहेत. “नवोपक्रम हा शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष शेतातील समस्यांवर उपाय देणारा, व्यावहारिक, सुलभ आणि परवडणारा असला पाहिजे. ही सहा तंत्रज्ञानं शेतकऱ्यांची उत्पादकता, नफा आणि दीर्घकालीन शाश्वतता वाढविण्याच्या आमच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहेत,” असे कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अंकुर अग्रवाल यांनी सांगितले.

क्रिस्टलने सोयाबीनसाठी पेटंट तंत्रज्ञानावर आधारित ‘सामोरियन’ हे तणनाशक आणि मक्यासाठी ‘टाकुरो’ हे संयुक्त तणनाशक सादर केले आहे. ही दोन्ही उत्पादने गवत व रुंद पानांच्या तणांवर प्रभावी नियंत्रण ठेवून पिकांच्या चांगल्या वाढीस मदत करतात.

भात पिकासाठी कंपनीने ‘झेबेरिया’ आणि ‘मॅक्सेंट्रा’ ही दोन अत्याधुनिक बुरशीनाशके बाजारात आणली आहेत. ही उत्पादने बुरशीजन्य व जिवाणूजन्य रोगांवर प्रभावी नियंत्रण ठेवून अधिक निरोगी पीक, उत्तम धान्य गुणवत्ता आणि वाढीव उत्पादनास हातभार लावतात.

कापूस पिकासाठी स्मार्ट ट्रिपल ॲक्शन तंत्रज्ञानावर आधारित ‘वाल्ट्रुवा’ हे कीटकनाशक सादर करण्यात आले असून ते रसशोषक किडींवर जलद, व्यापक आणि दीर्घकाळ टिकणारे संरक्षण देते. तसेच कंपनीने GreenAg तंत्रज्ञानावर आधारित ‘KGR-T’ हे ऑर्गेनिक स्मार्ट न्यूट्रिशन सोल्यूशनही लाँच केले आहे. हे उत्पादन पोषण कार्यक्षमता वाढवून फुले, फळधारणा आणि पिकाची लवचिकता सुधारण्यास मदत करते.

क्रिस्टल क्रॉप प्रोटेक्शनचे ब्रँड्स बिझनेस विभागाचे मुख्य व्यवसाय अधिकारी सोहित सत्यवली यांनी सांगितले की, विविध कृषी-हवामान क्षेत्रांतील व्यापक क्षेत्रीय पडताळणीनंतर विकसित करण्यात आलेली ही उत्पादने शेतकरी आणि चॅनल पार्टनर्सना अधिक सक्षम व सर्वसमावेशक उपाय उपलब्ध करून देतील. कंपनीने पुढील काळातही शाश्वत शेती, जबाबदार पीक संरक्षण आणि आधुनिक कृषी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून भारतीय शेतकऱ्यांना सक्षम करण्याची वचनबद्धता कायम असल्याचे स्पष्ट केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 9 3 1 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे