Breaking
अपघातई-पेपरब्रेकिंगसामाजिक

डंपर ने शाळकरी मुलीला चिरडले

चांदोरी जवळ नागपूर फाटा येथील घटना

0 3 3 0 5 1

निफाड तालुक्यातील चांदोरी जवळ नागापूर फाटा येथे एका डंपरणे इयत्ता सातवीत शिकणाऱ्या शाळकरी मुलीला चिरडल्याची अत्यंत हृदयद्रावक घटना घडली. सिद्धी मंगेश लुंगसे वय बारा वर्ष असे या दुर्दैवी मुलीचे नाव आहे. वेगाने जात असलेल्या डंपरच्या धडकेमुळे या मुलीचा जागीच भयानक अवस्थेत मृत्यू झाला. आज सकाळी ही घटना घडली.

या घटनेनंतर चांदोरी येथील नागरिकांनी नाशिक संभाजीनगर या महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. डंपर चालकाला कठोर शिक्षा करण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केली. पोलिसांनी डंपर ताब्यात घेतला असून चालकाचा शोध घेण्यात येत आहे. प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी सांगितले की डंपर वेगाने जात असल्यामुळे ही घटना घडली. या घटनेनंतर समोरून येणाऱ्या दुचाकी नाही या डंपरने धडक दिली असता दुचाकी वरील दांपत्य जखमी झाल्या असून त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 3 0 5 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे