Breaking
कृषीवार्ता

शेतीपंपाचा खंडीत वीजपुरवठा सुरळीत होण्यासाठी शेतकऱ्यांचा ठिय्या आंदोलन

अधिकाऱ्याकडून लेखी आश्वासनानंतर ठिया आंदोलन मागे

0 1 5 1 2 1

शेवगाव ( प्रतिनिधी):-  शेवगाव तालुक्यातील अनेक गावांचा शेतीपंपाचा वीजपुरवठा खंडीत झालेला असून हा शेतीपंपाचा वीजपुरवठा सुरळीत करावा यासाठी गहीले वस्ती,माळीवाडा, दादेगांव,खुंटेफळ या परिसरातील शिष्टमंडळाने शेवगाव तहसील कार्यालयात सुमारे एक तास ठिय्या आंदोलन केले.तालुक्यात गेल्या काही दिवसापासून दादेगांव,खुंटेफळ,घोटण,तळणी या भागासह शेवगाव शहरातील माळीवाडा,खुंटेफळ रोड, गहीले वस्ती या भागाचा शेतीपंपाचा वीजपुरवठा गेल्या आठ दिवसापासून खंडीत झालेला असून यामुळे या परिसरातील शेतक-यांची उभे पिके पाण्याअभावी जळण्याच्या अवस्थेत आहेत. अगोदरच पावसाने दडी मारल्याने हातातोडांशी आलेली ही पिके या खंडीत वीजपुरवठ्याने वाया जाणार असल्याने शेतकरी हवाल दिल झाला आहे.याचाच रोष व्यक्त करत आज परिसरातील शेतक-यांनी थेट तहसील कार्यालयात धडक देत तहसीलदार प्रशांत सांगडे यांच्या कार्यालयात सुमारे एक तास ठिय्या आंदोलन केले. यावेळी नायब तहसीलदार राहुल गुरव यांनी आंदोलक शेतकरी व वीज वितरण कंपनीचे अभियंता लोहारे यांच्यात चर्चा घडवून आणली यानंतर शेतकऱ्यांनी हे आंदोलन मागे घेतले.परंतू येत्या चार दिवसात हा वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास शेतकरी आपली जळालेली पिके घेऊन येत्या चार तारखेला वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात आंदोलन करणार असल्याचा ईशारा यावेळी शेतकऱ्यांनी दिला आहे यावेळी मनसेचे शेवगाव तालुका अध्यक्ष गणेश रांधवणे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय फुंदे, बाळासाहेब फटांगडे,देविदास हुशार, अशोक दारकुंडे,सिराज काझी, दिलीप काळे, सोमनाथ आधाट,अमोल देवढे, विकास आधाट, ज्ञानेश्वर देवढे, निवृत्ती आधाट,अंबादास काळे, गणेश नाबदे,नितीन देवढे, श्रीराम देवढे,वैभव घनवट,निलेश डमाळ, विठ्ठल देवढे, ज्ञानेश्वर डमाळ, नितीन घुगे,गोरख कौसे, राजेंद्र शहाणे, महादेव लंगोटे , मनोज रोडगे, संतोष घुगे यांच्यासह सुमारे शंभर ते दिडशे शेतकरी उपस्थित होते

एकीकडे पावसाने पाठ फिरविल्याने पिकाची वाढ खुंटली आहे काही थोडेफार प्रमाणात उपलब्ध असलेले पाणीसाठ्याच्या आधारावर पीक वाचण्यासाठी शेतकरी धडपड करत आहे मात्र महावितरण कंपनी वीजपुरवठा खंडित करत असल्याने शेतकरी वर्ग संकटात सापडला आहे मात्र शेतकऱ्यांना वाली कोण असा प्रश्न आता शेतकरी वर्ग मधून उपस्थित होत आहे

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Vijay

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 5 1 2 1

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे