‘मॅडनेस मचाएंगे इंडिया को हसाएंगे’मधल्या आपल्या ‘पती, पती आणि शेजारी’ गॅगविषयी सांगत आहे, परितोष त्रिपाठी
‘मॅडनेस मचाएंगे इंडिया को हसाएंगे’ या शनिवारी रात्री 9:30 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर!
या शनिवारी, सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘मॅडनेस मचाएंगे इंडिया को हसाएंगे’ या कॉमेडी शोमध्ये ‘गेम्स नाइट’ थीम असलेला रोचक भाग सादर होणार आहे. या भागात आपले विनोदवीर धम्माल गेम्स खेळतील शिवाय गॅग्ज आणि कोट्या, वन-लाइनर्स तर असतीलच!
या भागातल्या हास्य-दंगलीसाठी सज्ज व्हा, कारण परितोष त्रिपाठी, सागर कारंडे आणि हेमांगी कवी एकत्र येऊन ‘पती, पत्नी आणि शेजारी’ हा एक अनोखा गॅग सादर करणार आहेत. यामध्ये बायको झालेली हेमांगी आपल्या नवऱ्यासाठी काही चविष्ट पदार्थ घेऊन येते. नवऱ्याचे काम करणारा सागर आणि ती खायला सुरुवात करणार, इतक्यात त्यांचा शेजारी कडमडतो. परितोषने या त्रासदायक शेजाऱ्याचे काम केले आहे. आणलेले पदार्थ लपवण्यात आणि या अनाहूत पाहुण्याला घराबाहेर काढताना या जोडप्याची तारांबळ उडते, पण शेवटी शेजाऱ्याला त्या लपवलेल्या अन्नाचा वास येतोच! त्यानंतर ते जोडपे त्याचा कसा पाठलाग करते ही धमाल बघायला मिळेल.
या गॅगविषयी बोलताना परितोष त्रिपाठी म्हणाला, “अनेक लोकांच्या जीवनात भोचक शेजारी ही वास्तविकता असते. आपल्या आसपास देखील असे काही लोक असतातच जे इतरांच्या गोष्टींमध्ये नाक खुपसत असतात.. (हसतो). असा भोचक शेजारी करायला खूप मजा आली. कारण त्यात खूप गंमतीजमती होत्या. सागर आणि हेमांगी सोबत काम करण्याचा अनुभव मस्त होता. ते दोघे अत्यंत गुणी आणि चतुर आहेत. त्यांच्यामुळे सेटवर चैतन्य सळसळत असते. मला खात्री आहे की, प्रेक्षकांना हा गॅग नक्कीच आवडेल.”
बघायला विसरू नका, ‘मॅडनेस मचाएंगे इंडिया को हसाएंगे’ या शनिवारी रात्री 9:30 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर!