Breaking
ई-पेपरदेश-विदेशब्रेकिंगमहाराष्ट्रशासकीयसामाजिक

एसटी महामंडळाचा “आवडेल तेथे कोठेही प्रवास” महागला

शनिवारपासून सुधारीत दर लागू

0 2 5 5 5 9

नाशिक /किरण घायदार…

महाराष्ट्र राज्‍य मार्ग परिवहन महामंडळाने नुकतीच एसटी बस दरात १५ टक्क्यांची वाढ केली आहे. त्यामुळे ग्रामीण महाराष्ट्राची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या लालपरीचा प्रवास महागला आहे. सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागली असतानाच आता एसटी महामंडळाच्या “आवडेल तेथे कोठेही प्रवास” या सवलत योजनेच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
महाराष्ट्र राज्‍य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने आवडेल त्या ठिकाणी कोठेही प्रवास करण्यासाठी “आवडेल तेथे कोठेही प्रवास” ही सवलत योजना प्रवाशांसाठी एस टी मार्फत राबविली जाते. या योजनेअंतर्गत 7 दिवस व 4 दिवस याप्रमाणे बसेच्या प्रकारानुसार तसेच आंतरराज्यांसह प्रवास सुविधा उपलब्ध करुन दिली जाते. या योजने अंतर्गंत येणाऱ्या बससेवांचे प्रतिटप्पा दरात वाढ करण्यात आली आहे. नवीन टप्पा दरपत्रकाप्रमाणे देण्यात येणाऱ्या पासचे सुधारीत दर, अटी व शर्ती लागू करण्यास सक्षम प्राधिकारी यांनी मंजुरी दिली आहे. हे दर १ फेब्रुवारी २०२५ पासून अंमलात येणार आहे.

आवडेल तेथे कोठेही प्रवास पास योजनेअंतर्गत ४ दिवस आणि ७ दिवसांचे पास देण्यात येतात. या पासचे सुधारित दर खालीलप्रमाणे आहेत.
सेवेचा प्रकार

४ दिवसांच्या पासचे दर – साधी, जलद, रात्रसेवा प्रौढ- १८१४, मुले- ९१०  

७ दिवसांच्या पासचे दर – साधी, जलद, रात्रसेवा प्रौढ- ३१७१, मुले- १५८८

आंतरराज्य, शहरी, मिडीबस

शिवशाही (आसनी) प्रौढ- २५३३, मुले-१२६९

प्रौढ- ४४२९, मुले-२२१७

आंतरराज्यसह

१२ मीटर ई-बस (ई-शिवाई) प्रौढ- २८६१, मुले- १४३३

प्रौढ-५००३, मुले-२५०४

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 5 5 5 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे