अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये दुर्मिळ रक्तस्रावाच्या रुग्णांना जीवनदान
*अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल, नाशिक येथे दुर्मिळ रक्तस्रावाच्या रुग्णांना जीवनदान*
अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये पुन्हा एकदा तातडीच्या उपचारांमुळे रुग्णाचे प्राण वाचवण्यात यश आले आहे. 74 वर्षीय रुग्ण श्री. संपत दिवे आणि 40 वर्षीय मयूर केदारे यांना मोठ्या प्रमाणात रक्तस्राव व चक्कर येणे या तक्रारींमुळे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्वरित रक्त देऊन त्यांना स्टॅबिलाइज करण्यात आले व पुढील उपचारासाठी ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यात आले.
या वेळी हॉस्पिटलच्या गॅस्ट्रोएन्टरॉलॉजी विभागाचे संचालक व पोटविकार तज्ञ *डॉ. संदीप पाटील* व त्यांच्या तज्ज्ञ टीमने डॉ . . सारंग खडके आणि डॉ. अपूर्वा पोथरकर यांनी एंडोस्कोपी केली. तपासणीत रुग्णाला अत्यंत दुर्मिळ असलेल्या *“हिमोसफ्कस पॅनक्रियाटिकस” (Hemosuccus Pancreaticus)* या आजाराचे निदान झाले. या गुंतागुंतीच्या परिस्थितीत तात्काळ “कॉइलिंग” प्रक्रिया करून रक्तस्राव यशस्वीरित्या नियंत्रित करण्यात आला.
या उपचारात *इंटरवेंशन रेडिऑलॉजिस्ट डॉ. अमोल भालेकर* यांचे महत्त्वाचे योगदान राहिले. उपचारानंतर रुग्ण दुसऱ्याच दिवशी स्टॅबिलाइज होऊन आयसीयू मधून वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात आला.
*डॉ. संदीप पाटील* यांनी सांगितले की, “हिमोसफ्कस पॅनक्रियाटिकस हा अत्यंत दुर्मिळ आजार आहे. ऑगस्ट महिन्यात अशा चार रुग्णांचे यशस्वी उपचार आमच्या गॅस्ट्रो टीमने केले आहेत. त्वरित निदान व प्रगत तंत्रज्ञानामुळे अशा गुंतागुंतीच्या केसेसवर प्रभावी उपचार करणे शक्य झाले आहे.”
या रुग्णासाठी ही अत्युच्च दर्जाची साधने उपलब्ध करून देण्यात अशोका मेडिकव्हरचे सेंटर हेड श्री. अनुप त्रिपाठी तसेच कोऑर्डिनेटर्स डॉ. सुजाता जयकर आणि डॉ. प्रवीण वानखेडे यांचा मोलाचा वाटा होता.”
अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये *गॅस्ट्रोएन्टरॉलॉजी विभाग* अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज असून, रक्तस्रावासह सर्व प्रकारच्या गुंतागुंतीच्या पोटविकारांवर उच्च दर्जाची उपचारपद्धती उपलब्ध आहे.
नाशिक शहरातील अग्रगण्य अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल हे अत्याधुनिक तंत्रज्ञान, आधुनिक सुविधा आणि अनुभवी डॉक्टरांमुळे आरोग्यसेवेत आघाडीवर आहे. आपत्कालीन सेवा, आयसीयू, कार्डियाक केअर, गॅस्ट्रोएन्टरॉलॉजी, न्युरोलॉजी, ऑर्थोपेडिक्स, किडनी व लिव्हर केअर, मातृत्व व बालरोग विभाग यांसह सर्वसमावेशक आरोग्यसेवा येथे उपलब्ध आहे.
“ Every Life Matters” या तत्त्वावर कार्यरत राहून हॉस्पिटलने नाशिक आणि आसपासच्या रुग्णांना विश्वासार्ह व उच्च दर्जाची आरोग्यसेवा पुरवली आहे तसेच डॉ.अमोल शिंदे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना आपले मनोगत व्यक्त केले की अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल, नाशिक येथील गॅस्ट्रोएन्टरॉलॉजी विभाग हे सेंटर फॉर एक्सलन्स आहे. आम्ही एकाच छताखाली रुग्णांना उत्तम व सर्वसमावेशक उपचार देण्यास कटिबद्ध आहोत.”
या प्रसंगी सूत्रसंचालन डॉ. हर्षदा तळेगावकर यांनी केले आणि कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मार्केटिंग हेड श्री. शिवकुमार रोहडे व त्यांच्या टीमने परिश्रम घेतले.”



