FROM – RUSHIKESH JOSHI….
विंचूर : वे. शा.सं. श्री नंदकुमार जोशी गुरुजी यांच्या आणि नासिक येथील एक मुखी दत्त मंदिराची पुजारी श्री मयुरी बर्वे गुरुजी यांच्या आशीर्वादाने विंचूर येथील प्रतिष्ठित श्री कृष्णा जोशी गुरूजी यांचा दुबई दौरा नुकताच संपन्न झाला.
दुबई येथील तुषार शिरवाडे आणि प्रतिक जाधव यांच्या विनंती खातर ते अष्टमीचे हवन तसेच लक्ष्मी कुबेर पूजा सांगण्यासाठी दुबई येथे गेले होते.
भारता पासुन लांब दुबई सारख्या पाश्चिमात्य देशात तेथील यजमानांनी पाट, चौरंग, ताट, तांब्या, ताम्हण इ. इतर सर्व पूजेचे सर्व साहित्य मोठ्या हौसेने गोळा केले होते. गुरुजींनी यथासांग पूजा सांगितल्यानंतर त्यांनी समाधान व्यक्त केले.
भविष्यातही वडील श्री नंदकुमार जोशी गुरुजी तसेच इतर सहका-यांना परदेशी घेऊन जाऊन पाश्चिमात्य देशात पुजा अर्चना करण्याचा मानस यावेळी श्री कृष्णा जोशी गुरूजी यांनी व्यक्त केला.
दिलीप सोनवणे, संतोष देसले, प्रशांत गोरे तसेच समस्त ब्राह्मण वृंद आणि अनेक शुभचिंतकांनी कृष्णा गुरूजी यांना या दौ-यासाठी शुभेच्छा दिल्या.