Breaking
ब्रेकिंग

उगावच्या तरुणाचा मृतदेह चांदवड तालुक्यात आढळल्याने मुस्लिम समाज अस्वस्थ

0 4 2 9 5 7

उगाव येथील युवकाचा परसूल शिवारात पुलाखाली संशयास्पद अवस्थेत मृतदेह; घातपाताचा संशय

तातडीच्या चौकशीसाठी निफाडला मुस्लिम बांधवांचा भव्य मोर्चा

शिरवाडे वाकद :- चांदवड – निफाड मार्गावरील परसुली चिंचोली नदीच्या पुलाखाली पाण्यात काल एका तरुणाचा संशयास्पद अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. हा मृतदेह उगाव येथील शादाब रज्जाक तांबोळी (वय ३०) यांचा असल्याचे तपासात निष्पन्न झाले असून, या घटनेत घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणाच्या तातडीच्या चौकशीसाठी निफाड येथे मुस्लिम समाज बांधवांनी भव्य मोर्चा काढून दोषींना तत्काळ अटक करण्याची मागणी केली.
परसुल शिवारात दि.२२ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी सुमारे ९ वाजेच्या सुमारास स्थानिक नागरिकांना पुलाखाली पाण्यात मृतदेह दिसून आला. माहिती मिळताच चांदवड पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले व स्थानिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आला. पोलिसांनी केलेल्या पाहणीत मृताच्या दोन्ही हातांना नायलॉन दोरीने बांधून मांडीला आवळलेले होते. तसेच कमरेला अंदाजे २० ते ३० किलो वजनाचे डंबेल्स बांधलेले व तोंड कपड्याने घट्ट बांधलेले असल्याचे आढळले. मृताच्या अंगावर लाल रंगाचा हुडी टी-शर्ट, निळ्या रंगाची ट्रॅक पँट आणि पायात ९ नंबरची पॅरॉगॉन कंपनीची चप्पल होती. प्राथमिक तपासात मृतदेहाची ओळख पटविताना तो उगाव येथील शादाब तांबोळी यांचा असल्याचे स्पष्ट झाले. शादाब तांबोळी हे दिनांक १८ फेब्रुवारीपासून बेपत्ता असल्याची नोंद निफाड पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. त्यामुळे सदर मृत्यू नैसर्गिक नसून घातपाताचा असल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला आहे.
घटनेची माहिती मिळताच निफाड पोलिसांनी देखील घटनास्थळी दाखल होत तपास सुरू केला. घटनास्थळ पंचनामा, वैद्यकीय तपासणी तसेच तांत्रिक पुरावे संकलित करण्याचे काम सुरू असून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली चांदवड व निफाड पोलीस संयुक्तरीत्या तपास करीत आहेत.
दरम्यान, उगाव येथे संतापाचे वातावरण असून प्रकरणाचा लवकरात लवकर उलगडा करावा, अशी मागणी नातेवाईक व नागरिकांकडून होत आहे. या प्रकरणाचा तातडीने तपास करून दोषींवर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी आज (दि. २३) निफाड येथे मुस्लिम समाज बांधवांनी भव्य मोर्चा काढत पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांना निवेदन दिले. मोर्चातून कारवाईची जोरदार मागणी करण्यात आली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 2 9 5 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे