
कडवा वसाहत येथील जिल्हा परिषद शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात साजरा
बेलगाव कुऱ्हे : छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त कडवा वसाहत येथील जिल्हा परिषद शाळेत सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. चिमुकल्या विद्यार्थ्यांनी नृत्य, नाटिका, आदिवासी नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन सर्व पालक व माता पालक यांनी केले होते. इगतपुरीचे गटशिक्षणाधिकारी निलेश पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी किशोर सोनवणे यांचे मार्गदर्शन कार्यक्रमासाठी लाभले. याप्रसंगी केंद्रप्रमुख अनिल पगार, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष किशोर गोडे, माजी सभापती सोमनाथ जोशी आदींसह ग्रामस्थ, महिला व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महेश बनकर व सूत्रसंचालन महावीर पवार यांनी केले. यावेळी विनायक पानसरे, विनोद पाटील, राजेश गावित, श्री लोहकरे, शिवाजी फटांगरे, चंद्रकांत भांगरे, उमेश गरुड, रामेश्वर खांडेभराड, संजय लोहरे, शिवाजी भगत, ज्ञानेश्वर बांगर उपस्थित होते. किरण गोडे, यादव गोडे, भोरू रोंगटे, दत्तू भगत, राहुल देवकर, योगेश झनकर, रामकृष्ण झनकर, गोविंद जोशी, ज्ञानेश्वर कुंदे, संदीप भगत, रामदास कुंदे व युवा मित्र मंडळ कडवा वसाहत यांनी कार्यक्रम यशस्वितेसाठी मेहनत घेतली.