Breaking
सामाजिक

*येवला व लासलगाव आगारास प्रत्येकी २५ नवीन बसेस प्राधान्याने द्या – माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ*

0 2 5 4 1 1

*येवला व लासलगाव आगारास प्रत्येकी २५ नवीन बसेस प्राधान्याने द्या – माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ*

*येवला व लासलगाव आगारास प्रत्येकी २५ नवीन बसेस प्राधान्याने द्या; माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांची परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे मागणी*

*नाशिक,येवला,लासलगाव,दि.७ जानेवारी :-* येवला व लासलगाव या दोन्ही आगारांमध्ये बसेसचा तुटवडा असल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे येवला व लासलगाव आगारास प्रत्येकी २५ नवीन बसेस प्राधान्याने द्या अशी मागणी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, रा.प. येवला व लासलगाव या दोन्ही आगारांमध्ये बसेसचा तुटवडा असल्यामुळे मोठ्या प्रमाणात तक्रारी होत आहे. येवला आगारात कोरोना प्रादुर्भावापूर्वी प्रवाशांच्या सेवेसाठी ५२ एस.टी. बसेस होत्या. त्यामुळे येवला तालुक्यातील सर्व गावांना वेळेवर बसेस मिळत होत्या. मात्र सद्यस्थितीत फक्त ३५ बसेसच उपलब्ध असून त्यातील सुद्धा दोन बसेस नादुरुस्त असतात. म्हणजेच केवळ ३२/३३ बसेसमध्ये काम भागवले जात आहे. कोरोना काळानंतर २२ बसेस स्क्रॅप झाल्या आहे. मात्र एकही नवीन बस न मिळाल्याने आगारातील बसेस कमी झाल्या आहे. त्यामुळे तालुक्यातील ग्रामीण भागातील बऱ्याच गावांच्या फेऱ्या कमी करण्यात आल्या आहेत व काही गावांना जाणाऱ्या बसेस बंद झाल्याने ग्रामीण भागातील प्रवासी विशेषतः शाळकरी विद्यार्थ्यांची व ज्येष्ठ नागरिकांची प्रवासासाठी मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे येवला आगारास किमान २५ नवीन एस.टी. बसेसची आवश्यकता असल्याचे म्हटले आहे.

तसेच राज्य परिवहन विभागाच्या लासलगाव (जि. नाशिक) आगारात ५६ पैकी २२ बसेस नादुरुस्त झाल्या असून केवळ ३४ बसेस सेवेत आहेत. कोरोनापूर्वी लासलगाव बस आगारात ५६ बसेस या प्रवाशांच्या सेवेसाठी होत्या. मात्र आत्ता फक्त ३४ बसेस लासलगाव सेवेत आहेत. बाकी स्क्रॅप झाल्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहे. बसेसच्या कमी संख्येमुळे आगारातून सुटणाऱ्या अनेक बस या वेळेवर सुटत नाही किंवा अचानक रद्द केल्या जातात. यामुळे विद्यार्थी, नोकरदार व कामगार वर्ग आणि इतर प्रवाशांना वेळेत पोहोचता येत नसल्याच्या अनेक तक्रारी आहे. बस आगारातून पूर्वी नाशिककरिता दर अर्ध्या तासाने बस सेवा सुरू होती व तीच बस नाशिक आगारातून परत लासलगावकरिता परत येत होती. त्यामुळे किमान १५ ते २० फेऱ्या बसेसच्या लासलगाव ते नाशिक होत होत्या. त्या पूर्णतः बंद झाल्या असल्याचे म्हटले आहे.

आशिया खंडात कांद्यांची मोठी बाजारपेठ म्हणून नावलौकिक असलेली लासलगाव बाजारपेठ आहे. देशाच्या विविध भागातून व्यापारी व कांद्याशी संबंधित असणाऱ्यांची वर्षभर ये-जा चालूच असते. लासलगाव हे चांदवड, मनमाड, येवला, कोपरगाव, नाशिक, पिंपळगाव, निफाड यासारख्या मोठ्या व्यापारी तालुक्यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे. परंतु बसेसच्या कमी संख्येमुळे विद्यार्थ्यांसह प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. लासलगाव येथील बस सेवा ही पूर्वीच्या शंभर टक्के च्या तुलनेत केवळ दहा टक्केच प्रवासी वर्गाला दिली जात आहे. लासलगाव आगारातील स्क्रॅप बसेसच्या जागी नवीन २५ बसेसची आवश्यकता आहे. त्यामुळे रा.प. येवला आगारासाठी किमान २५ नवीन बसेस आणि लासलगाव आगारासाठी २५ बसेस प्राधान्याने मिळाव्यात अशी मागणी छगन भुजबळ यांनी पत्राद्वारे केली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 5 4 1 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे