प्रथमेश संगिता गुलाबराव पाटील यांची नियुक्ती
शिवसेना युवासेनाच्या उत्तर महाराष्ट्र समन्वयकपदी
प्रथमेश संगिता गुलाबराव पाटील यांची नियुक्ती
नाशिक : प्रतिनिधी
वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या आशिर्वादाने व शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब (मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य) यांच्या आदेशानुसार, खासदार डॉ. श्रीकांतजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना कार्याध्यक्ष पुर्वेश परिषा प्रताप सरनाईक यांच्या विनंतीनुसार प्रथमेश संगिता गुलाबराव पाटील यांची शिवसेना पक्षाच्या “युवासेना समन्वयक उत्तर महाराष्ट्र (जळगाव, नंदूरबार, धुळे)” पदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे.
वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची शिकवण आत्मसात करून शिवसेना पक्ष वाढीसाठी आपण सर्वांना सोबत घेऊन कार्य कराल असा विश्वास नियुक्ती पत्रात दिला आहे.
प्रथमेश पाटील याची नियुक्ती होताच सर्वच स्तरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. दिलेली जबाबदारी यशस्वी रित्या पार पडणारचे असल्याचे आश्वासन प्रथमेश पाटील यांनी दिले आहे. पाटील यांनी हया आदी उत्तर महाराष्ट्र युवासेना विद्यापीठ व कॉलेज कक्ष जबाबारी सांभाळली आहे. त्याच्या कार्याची दखल घेत सदर नियुक्ती देण्यात आली आहे.