मरळगोई येथे २७ वर्षांनी आली बस, विद्यार्थ्यांची झाली सोय
लासलगाव –
निफाड तालुक्यातील मरळगोई येथे २७ वर्षांपासून विद्यार्थी आणि पालकांकडून बस सेवा सुरू करण्याची मागणी करण्यात येत होती. या मागणीस यश मिळाले आहे. मरळगोई येथे सत्तावीस वर्षांनी बसचे आगमन विद्यार्थी आणि पालकांनी बसचे जोरदार स्वागत केले. परिसरातील पाच गावांना या बस सेवेचा लाभ होणार आहे.
मरळगोई येथील सामाजिक कार्यकर्ते माधव जगताप, गणेश बनसोडे, सुनील जाधव, प्रकाश बनसोडे, चंद्रकांत जगताप, चांगदेव जगताप, पोलीस पाटील दौलत बनसोडे, अशोक जगताप, सुनील दरेकर, संजय जगताप, विहाय जगताप, जालिंदर जगताप, समाधान जगताप, अविनाश जगताप, दत्तात्रय जगताप, योगेश घुगे, गणेश जगताप, गणेश बनसोडे, शरद जगताप, रमण सोमवंशी, संदीप दरेकर यांसह गावकऱ्यांनी बस वाहक आणि चालक यांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार केला. पहिल्याच दिवशी पंचवीस विद्यार्थ्यांनी बस प्रवासाचा लाभ घेतला. मरळगोई येथुल सकाळी साडे नऊ वाजता लासलगाव येथे जाण्यासाठी बस असेल तर साडे पाच वाजता लासलगावहुन मरळगोई अशी बस असेल. सर्व नागरिकांनी बस सेवेचा लाभ घ्यावा आणि मुलांना शाळेत पाठवावे असे आवाहन ग्रामस्थांनी केले आहे.