Breaking
ब्रेकिंग

लासलगाव ते पिंपळगाव ४५ कोटी रुपयांच्या रस्त्याचे काम मंजूर

0 4 2 9 5 7

मंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांतून….

नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यातून राष्ट्रीय महामार्गाला पर्यायी लासलगाव ते पिंपळगाव रस्त्याच्या कामाला मंजुरी

लासलगाव ते पिंपळगाव ४५ कोटी रुपयांच्या रस्त्याचे काम मंजूर

मार्च २०२७ अखेर रस्त्याचे काम होणार पूर्ण…

नाशिक,  दि. २७ नोव्हेंबर :- राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांतून नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महामार्गाला पर्यायी आणि वाहतुकीसाठी महत्वाचा असलेल्या लासलगाव ते पिंपळगाव या रस्त्याच्या सुधारणेसाठी ४५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

निफाड, येवला, मनमाड, नांदगाव तालुक्यातील नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या भाविकांना पर्यायी मार्ग म्हणून लासलगाव व पिंपळगाव रस्त्याचे मजबुतीकरण करून रास्याची सुधारणा करण्याची मागणी राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केली होती. त्यानुसार या रस्त्याच्या सुधारण्यासाठी प्रशाकीय मान्यता देण्यात आली असून त्यासाठी ४५ कोटी रुपयांच्या निधी मंजूर करण्यात आला आहे. लवकरच या कामाला सुरुवात करण्यात येऊन मार्च २०२७ अखेर या रस्त्याचे काम पूर्ण करण्यात येणार आहे.

पिंपळगाव पालखेड लासलगाव हा २९ किलोमीटरचा रस्ता आहे. हा रस्ता त्रंबकेश्वर, दिंडोरी, निफाड व नांदगाव (मनमाड) तालुक्यांना जोडणारा राज्य मार्ग आहे. सदर रस्त्यावर पिंपळगाव व लासलगाव कृ.उ.बाजार समिती आहे. तसेच लासलगाव व मनमाड रेल्वे स्टेशन आहे. सदर कामामुळे लासलगाव रेल्वे स्टेशन ते पिंपळगाव (राष्ट्रीय महामार्ग) जोडला जाणार असुन आपतकालीन परिस्थिती मध्ये मनमाड, लासलगाव स्टेशन ते पिंपळगाव (राष्ट्रीय महामार्ग) यांना जोडणारा पर्यायी राज्य मार्ग आहे.

तसेच हा रस्ता दिंडोरी तालुक्यातून त्रंबकेश्वरला जोडणारा महत्वाचा राज्य मार्ग आहे. लासलगाव शहरामधुन गुजरात हद्द सावळदे छडवेल सटाणा चांदवड लासलगाव विंचुर सावळिविहीर (शिर्डी) रस्ता ( रामा क्र.७) हा जात असुन गुजरात राज्यातील शिर्डीला जाण्या-या भाविकांची मोठी वर्दळ असते. तसेच सदर रस्त्यावर लासलगाव कांदा मार्केट असुन सिंहस्थ काळामध्ये कांदा वाहतुकीचा काळ असल्याने सदर वाहतूक सुरळीत होणेसाठी सदर रस्ता अतिशय महत्वाचा ठरणार आहे.

लासलगाव ते पिंपळगाव हा रस्ता लासलगाव कोटमगाव चौफुली ते कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव पर्यंत १० मीटर रुंदीचा काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. या ठिकाणाहून पुढे सारोळे खु. पर्यंत ७ मीटर रुंद काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. तर सारोळे खुर्द ते लोनवाडी पर्यंत रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करण्यात येणार आहे. या रस्त्याच्या कामामुळे शेतकरी व इतर प्रवाश्यांना दळणवळणाच्या दर्जेदार सुविधा उपलब्ध होणार आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 2 9 5 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे