Breaking
धार्मिकब्रेकिंगसामाजिक

हजारोंपेक्षा अधिक भाविक पिनाकेश्वर चरणी नतमस्तक

0 3 2 1 2 3

जातेगाव येथे महाशिवरात्री निमित्ताने हजारोंपेक्षा अधिक भाविक पिनाकेश्वर चरणी नतमस्तक

नांदगाव, दि.26 (मुक्ताराम बागुल):- नाशिक जिल्ह्यातील श्री क्षेत्र त्रिंबकेश्वर नंतर दुसऱ्या क्रमांकाचे मोठ्या महादेवाचे देवस्थान म्हणून ओळखले जाणारे नांदगाव तालुक्यातील जातेगाव पासून उत्तर बाजूस सात ते आठ किलो मीटर अंतरावरील सह्याद्री पर्वत रांगेच्या शिखरावर निसर्गरम्य ठिकाणी असलेल्या श्री क्षेत्र पिनाकेश्वर महादेवाचे चरणी दिनांक 26 फेब्रुवारी 2025 रोजी महाशिवरात्री निमित्ताने भल्या पहाटेपासून सायंकाळी उशिरापर्यंत सुमारे 50 हजारापेक्षा अधिक आबाल वृद्धांसह महिला भाविकांनी बम बम बोले, भगवान पिनाकेश्वर महादेव की जय, हर हर महादेव च्या गजरात मोठ्या उत्साहाने देवाच्या चरणी नतमस्तक झाले.


यावेळी महा देवाच्या दर्शनासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर, कन्नड तालुक्यातील अहमदनगर जिल्ह्याच्या कोपरगाव तालुक्यातील सहा दिंड्यांमध्ये शेकडो महिला व पुरुष सुमारे 50 ते 80 किलोमीटर पायी चालत आले होते. महाशिवरात्री चा उपवास असल्याने श्री पिनाकेश्वर महादेव मंदिर देवस्थान तर्फे व येथील माजी सैनिक बांधवांच्या वतीने आणि छत्रपती संभाजी नगर येथील दानशूर व्यक्तिमत्व राजेंद्र भालेराव तसेच ग्रामस्थांच्या वतीने साबुदाणा खिचडी, खजूर मोफत वितरण करण्यात आले. त्याचप्रमाणे दीपक पगारे यांनी पिण्यासाठी पाणी मोफत उपलब्ध करून दिले.

सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील नांदगाव तालुक्याचे आमदार सुहास अण्णा कांदे यांच्यावतीने युवा सेना नेते गुलाब चव्हाण आणि मारुती सोनवणे यांनी येथे देवाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मोफत रुद्राक्ष भेट दिले. भाविकांचे सुरेश दर्शन व्हावी यासाठी देवस्थान ट्रस्टच्या वतीने छत्रपती संभाजीनगर येथील खाजगी सुरक्षा रक्षक तैनात केले होते. तसेच नांदगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या मार्ग दर्शनाखाली पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष बहाकर, पोलीस हवालदार भास्कर बस्ते आणि पोलीस कॉन्स्टेबल परमेश्वर श्रीखंडे व मनमाड येथील दंगा नियंत्रण पक्ष होमगार्ड पथक यांनी मंदिर परिसरात व ठिकठिकाणी योग्य बंदोबस्त ठेवल्याने आलेल्या भाविकांचे व्यवस्थित दर्शन झाल्याने समाधान व्यक्त करण्यात आले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 2 1 2 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे