Breaking
ब्रेकिंग

‘लग्न आणि बरंच काही’ सिनेमाला सिनेप्रेमींचा भरभरून प्रतिसाद!

0 5 2 0 9 3

आजच्या जनरेशनच्या चॅटिंग, डेटिंग अन् लग्नाची सेटिंग ला ; प्रेक्षकांची दाद!

‘लग्न आणि बरंच काही’ सिनेमाला सिनेप्रेमींचा भरभरून प्रतिसाद!

कधी एका राईट स्वाइपवर जुळणारं कनेक्शन, कधी चॅटिंगमधून फुलणारं प्रेम, तर कधी लग्नाच्या वळणावर बदलणारं नात्यांचं समीकरण. डिजिटल युगातील प्रेमाची ही अनोखी कहाणी ‘लग्न आणि बरंच काही’मधून मोठ्या पडद्यावर रंगत असून प्रेक्षकांच्या मनावर प्रेमाची मोहोर उमटवत आहे!

महाराष्ट्रभरातील चित्रपटगृहांत २३ ऑक्टोबरपासून प्रदर्शित झालेल्या वेदांती चंद्रकांत दाणी दिग्दर्शित ‘लग्न आणि बरंच काही’ला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त दाद मिळत आहे. आजच्या पिढीच्या प्रेमविश्वाचा वेध घेणारी कथा, नात्यांमधील भावनिक चढ-उतार आणि मनोरंजनाची धमाल यामुळे चित्रपट प्रेमींशी नातं जोडत आहे. विशेषतः पूजा सावंत आणि अभिजीत खांडकेकर यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री चर्चेचा विषय ठरत असून, त्यांच्या जोडीला खास पसंती मिळत आहे.
आधुनिक नातेसंबंधांचा वेध घेताना विनोद आणि भावनांचा सुंदर समतोल साधणारी ही कथा प्रेक्षकांना आपलीशी वाटत आहे. पूजा सावंत आणि अभिजीत खांडकेकर या लोकप्रिय जोडीने आपल्या सहज अभिनयातून आणि पडद्यावरील केमिस्ट्रीतून प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. नात्यांमधील लहानसहान प्रसंग, संवादांमधील मिश्कीलपणा आणि भावनिक क्षण यांमुळे चित्रपटाला एक वेगळीच रंगत मिळाली आहे. मनोरंजनाची मेजवानी देतानाच प्रेम आणि लग्नाकडे पाहण्याचा आजच्या पिढीचा दृष्टिकोन मांडणारा हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीची पावती मिळवत आहे.

चित्रपटातील संगीतही प्रेक्षकांसाठी खास आकर्षण ठरत आहे. वैशाली सामंत यांच्या संगीत दिग्दर्शनासोबतच त्यांच्या सुमधुर आवाजाने सजलेली गाणी चित्रपटाच्या उत्साहात भर घालतात. अवधूत गुप्ते, स्वप्नील बांदोडकर, सुरेश वाडकर, मैथिली जोशी आणि अवनी तुषार नान्नजकर यांच्या आवाजाने सजलेली गाणी प्रेम, लग्नाची धामधूम आणि नात्यांचे विविध रंग अधिक खुलवतात.

नाद स्टुडिओस प्रस्तुत, अव्यान आर्ट्स आणि म्हाळसा एंटरटेनमेंट निर्मित, तसेच पिकल एंटरटेनमेंट यांच्या सहयोगाने साकारलेल्या या चित्रपटात पूजा सावंत आणि अभिजीत खांडकेकर यांच्यासोबत अक्षया नाईक, सुकन्या गुरव, भारती पाटील आणि इतर कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये आहेत. अंजली तुषार नान्नजकर आणि डॉ. संजना सुरेश पै या चित्रपटाच्या निर्मात्या असून, यशश्री मसूरकर यांनी चित्रपटाची कथा लिहिली आहे.

आजच्या पिढीच्या डेटिंग कल्चरपासून लग्नाच्या निर्णयापर्यंत अनेक प्रश्नांना हलक्याफुलक्या अंदाजात भिडणारा ‘लग्न आणि बरंच काही’ प्रेक्षकांना स्वतःच्या आयुष्याशी जोडणारा अनुभव देत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 2 0 9 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे