Breaking
ई-पेपरब्रेकिंगमहाराष्ट्र

2025 मध्ये नाशिकने इन्स्टामार्टवर कशी मोठी खरेदी केली

0 4 2 9 5 7

नाशिकच्या एका रहिवाशाने क्विक कॉमर्सवर जवळपास 3 लाख रुपये खर्च केले, ज्यात त्यांनी आपल्या कार्टमध्ये सोन्याची नाणी, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, एनर्जी ड्रिंक्स आणि बाळाच्या काळजीच्या आवश्यक वस्तू जोडल्या: 2025 मध्ये नाशिकने इन्स्टामार्टवर कशी मोठी खरेदी केली

~ नाशिकच्या फ्लेवर, फिटनेस आणि भरलेल्या कार्टचा वर्षाचा आढावा ~

नाशिक – ‘भारताची वाइन राजधानी’ म्हणून ओळखले जाणारे नाशिक शहर आता भारतातील सर्वात उत्साही क्विक-कॉमर्स शहरांपैकी एक म्हणून उदयास आले आहे. भारतातील अग्रगण्य क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्म असलेल्या इन्स्टामार्टने आपल्या वर्षाच्या शेवटी तयार करण्यात येणाऱ्या वार्षिक ग्राहक ट्रेंड अहवालाची पाचवी आवृत्ती, ‘हाऊ इंडिया इन्स्टामार्टेड 2025’ सादर केली आहे, ज्यातून नाशिकमध्ये या वर्षी मोठ्या प्रमाणावर, धाडसीपणे आणि वैविध्यपूर्ण पद्धतीने खरेदी झाल्याचे लक्षात आले.

2025 मध्ये, नाशिकमधील सर्वाधिक खर्च करणाऱ्या इन्स्टामार्ट वापरकर्त्याने वार्षिक जवळपास 3 लाख रुपयांचा खर्च केला, ज्यामध्ये दैनंदिन किराणा मालासोबतच सोन्याची नाणी, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, एनर्जी ड्रिंक्स आणि बाळांच्या देखभालीच्या आवश्यक वस्तूंचा समावेश होता. त्यानंतर अगदी जवळचा टप्पा म्हणजे अनेक ग्राहकांनी 2.5 लाख रुपयांचा टप्पा ओलांडला, ज्यामुळे क्विक कॉमर्सच्या बाबतीत नाशिक एक महत्त्वाचे प्रीमियम-शॉपिंग शहर म्हणून स्थापित झाले. या वर्षी, नाशिकमधील खरेदीची व्याप्ती किराणा मालापलीकडे खूप विस्तारित झाली. क्रीडा आणि फिटनेस श्रेणीत 750% वाढ झाली, जे शहराची आरोग्य आणि घरगुती व्यायामामध्ये वाढती गुंतवणूक दर्शवते. किराणा-व्यतिरिक्त इतर श्रेणींमध्येही सातत्याने वाढ झाली, ज्यामुळे नाशिक शहरातील लोकं जीवनशैलीला प्राधान्य देत सोयीसुविधांचा स्वीकार करत आहे हे दिसून येते.

स्विगी चे चीफ बिझनेस ऑफिसर हरी कुमार गोपीनाथन म्हणाले, “भारतात क्विक कॉमर्स आता केवळ सोयीपुरता मर्यादित राहिलेला नाही. तो आधुनिक भारतीय जीवनशैलीचा एक अविभाज्य भाग बनला आहे. सुरुवातीला शेवटच्या क्षणी लागणाऱ्या वस्तू किंवा अचानक होणाऱ्या खरेदीपुरता मर्यादित असलेला हा प्रवास आता नियोजित खरेदी आणि मोठ्या किमतीच्या वस्तूंपर्यंत पोहोचला आहे, दैनंदिन गरजेच्या वस्तूंपासून ते प्रीमियम वस्तूंपर्यंत. तातडीची गरज असो, थोडी लक्झरी खरेदी असो किंवा रोजच्या वापरातील वस्तू असोत, लोकांना जे काही हवे आहे त्यासाठी इन्स्टामार्ट एक विश्वासार्ह भागीदार म्हणून स्वतःला सिद्ध करत आहे. आमच्याकडून अपेक्षित असलेली वेगवान आणि विश्वासार्ह सेवा देत राहणे, हेच आमचे वैशिष्ट्य आहे.”

2025 मध्ये नाशिकमध्ये इन्स्टामार्टवर सर्वाधिक कोणत्या वस्तूंची खरेदी झाली?

· मनापासून खाद्यप्रेमी: नाशिकमधील सर्वाधिक ऑर्डरमध्ये मसालेदार नमकीन, चीझी चिप्स, चॉकलेट बिस्किटे, मिनरल वॉटर आणि साखर यांचा समावेश होता: हे अशा शहराचे उत्तम चित्र आहे, ज्याला गोड, खारट आणि कुरकुरीत पदार्थ खूप आवडतात.

· संध्याकाळ = स्वयंपाकघराची महत्त्वाची वेळ: नाशिकमधील स्वयंपाकाची सर्वात व्यस्त वेळ सूर्यास्तानंतरची होती. शहरात दही, पनीर, बटाटे, टोमॅटो आणि दुधाचे पॅकेट खरेदी केले जात होते –नाशिक शहर मागणीनुसार ताज्या पदार्थांसह रात्रीच्या जेवणाची तयारी करून दिवसाचा शेवट करते हे लक्षात येते.

· एक संतुलित कार्ट संस्कृती: जरी स्नॅक्स आघाडीवर असले तरी, नाशिकच्या कार्टमध्ये रोजच्या वापरातील पदार्थ, कम्फर्ट फूड्स आणि घरगुती स्वयंपाकासाठी आवश्यक असलेल्या वस्तूंबद्दलची वाढती आवडही दिसून आली.

· कार्टमध्ये सर्वात जास्त किंमतीच्या वस्तू कोणत्या भरल्या गेल्या: इलेक्ट्रॉनिक्स, फिटनेस उपकरणे, किराणा मालाच्या आवश्यक वस्तू, भेटवस्तू देण्यासाठी लागणाऱ्या वस्तू, सणासुदीच्या आवडीच्या वस्तू आणि चैनीच्या खरेदी केलेल्या वस्तू यांचे एक विचारपूर्वक केलेले मिश्रण.

दरम्यान, 2025 मध्ये उर्वरित भारत फक्त खरेदी करत नव्हता, तर इन्स्टामार्टच्या मदतीने दैनंदिन जीवन अधिक सोपे आणि कार्यक्षम बनवत होता. दूध देशातील क्रमांक एक गरजेची वस्तू ठरली. भारतात दर सेकंदाला 4 पेक्षा जास्त दूधाच्या पिशव्या ऑर्डर केल्या गेल्या, एवढ्या की त्यातून तब्बल 26,000 ऑलिम्पिक आकाराचे जलतरण तलाव भरू शकतील. मोठ्या खरेदीतही भारत आघाडीवर राहिला. हैदराबादमधील एका युजरने वर्षातील सर्वात मोठी सिंगल कार्ट ऑर्डर 4.3 लाख रुपयांची केली, ज्यामध्ये तीन आयफोन 17 प्रोचा समावेश होता.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 2 9 5 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे