Breaking
सामाजिक

येवल्याच्या विकासासाठी मंत्री छगन भुजबळ यांचे पहिले प्राधान्य – माजी आमदार पंकज भुजबळ

0 1 5 1 2 2

निफाड, लासलगाव,दि.५ ऑक्टोबर :- येवल्याच्या विकासासाठी येवला मतदारसंघातील जनतेने मंत्री छगन भुजबळ यांना निवडून दिले. गेली वीस वर्ष ते या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहे. त्यांनी मतदारसंघात हजारो कोटी रुपयांची कामे केली आहे. वस्ती वाडी पासून ते शहरापर्यंत विविध विकास कामे त्यांनी केली आहे. येवल्याच्या विकासासाठी मंत्री छगन भुजबळ यांचे पहिले प्राधान्य आगामी काळात अधिकची कामे त्यांच्या माध्यमातून केली जातील असे प्रतिपादन माजी आमदार पंकज भुजबळ यांनी केले.

मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून येवला मतदारसंघातील निफाड तालुक्यातील धरणगाव खडक, धारणगाव वीर, नांदगाव, वनसगाव, खडक माळेगाव, मानोरी खुर्द, आणि येवला तालुक्यातील मानोरी येथे मंजूर करण्यात आलेल्या विविध विकास कामांचे भूमिपूजन माजी आमदार पंकज भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे, तालुकाध्यक्ष भाऊसाहेब भवर, लासलगाव बाजार समितीचे सभापती डी.के.जगताप, शेखर होळकर, डॉ.श्रीकांत आवारे, छबू जाधव, महिला अध्यक्षा सुरेखा नागरे, अशोक नागरे, भाऊसाहेब बोचरे, विनोद जोशी, सरपंच सचिन दरेकर, दत्तूपंत डुकरे, नवनाथ काळे, खंडेराव सोनवणे, सुभाष जाधव, तुकाराम गांगुर्डे, विलास गोरे, ह.भ.प.निवृत्ती महाराज रायते, दत्तात्रय रायते, संतोष राजोळे, माधव कान्हे, अनिल सोनवणे, पांडुरंग राऊत, सुरेश सानप, अंबादास पुंड, राजाभाऊ गंभीरे, बापू दराडे, कैलास सोनवणे, देवराम सोनवणे, मच्छिंद्र पुंड, राजेंद्र गंभीरे, जनार्दन बोडके, भगवान सानप, आदित्य गंभीरे, योगेश सानप, सोमनाथ पुंड, संजय मघाडे, कार्तिक माघाडे, सचिन रुकारी, सुधाकर कांदळकर, बाळासाहेब निकम, नितीन वाघ, धनंजय निकम, कृष्णा वाघ, मधुकर निकम, राजेंद्र गोरणे, बापू बागल, विलास निकम, सोमनाथ बर्डे, गणेश निकम, गुलाब मघाडे, जगदीश पवार, जयवंत रायते, कैलास रायते, रावसाहेब रायते, बाळू रायते, कैलास रायते, नाना नेहरे, सुरेश रायते, शांताराम रायते, यादव रायते, तुकाराम रायते, बाळासाहेब रायते, बाळासाहेब घोलप, मोतीराम रायते,राहुल डुंबरे, डॉ.योगेश डुंबरे, के.बी.शिंदे, शिवाजी डुंबरे, अशोक शिंदे, धनंजय डुंबरे, प्रकाश कापडी, प्रकाश कडाळे, मोहन जावळे, शिवाजीराव वाघ, बाळासाहेब डुंबरे, बाळासाहेब शिंदे, भास्कर अस्वले, संतोष अस्वले, विश्वनाथ वाघ, बाळासाहेब कापडी, नितीन शिंदे, गणपत शिंदे, योगेश शिंदे, सुनील डुंबरे, अरुण पाटील,सरपंच भारती गवळी,बापू पवार, विष्णू लुटे, संपतराव जाधव, सुनील कुंदे, दिलीप गायकवाड
कैलास जाधव, अंबादास जाधव, राजू पोटे, बापू जाधव, रवींद्र जाधव, मोतीराम जाधव, तुळशीराम जाधव, योगेश गवळी, संदीप गवळी, नंदराम शेळके, आप्पासाहेब शेळके, उत्तम तीपायले, सदाभाऊ शेळके, सुरेश शेळके, दत्ता शेळके, अण्णाभाऊ वावधने, पंढरीनाथ तीपायले, साहेबराव शेळके, लहानु शेळके यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी माजी आमदार पंकज भुजबळ म्हणाले की, येवला मतदरसंघाला जलसंजिवनी मिळण्यासाठी पश्चिमेकडे वाहून जाणारे पाणी पूर्वेकडे वळविले. मांजरपाडा प्रकल्पाच्या माध्यमातून हे पाणी आता येवला तालुक्यात पोहचले आहे. आज हा राज्यातील पथदर्शी प्रकल्प बनला आहे. याचबरोबर मतदारसंघात त्यांनी अनेक बंधारे, सिंचन योजना, पिण्याच्या पाण्याच्या योजना, रस्त्याची कामे, आरोग्याच्या दृष्टीने, शिक्षणासाठी विविध कामे मतदारसंघात केले. कुठल्याही जाती धर्माचा विचार न करता प्रत्येक घटकाचा विकास करण्यासाठी त्यांनी मोलाचे योगदान दिलं असल्याचे त्यांनी सांगितले.

आमचं मत मंत्री छगन भुजबळ यांनी केलेल्या विकासाला

येवला मतदारसंघात सर्व घटकांना न्याय देण्याचं काम मंत्री छगन भुजबळ यांनी गेल्या वीस वर्षात केले. हजारो कोटी रुपयांची विकास कामे मतदारसंघात झाली अजूनही आम्हाला अधिक कामे करायचे आहे. त्यासाठी आगामी निवडणुकीत आमचं मत मंत्री छगन भुजबळ यांनी केलेल्या विकासाला असेल असा निर्धार उपस्थित नागरिकांनी यावेळी केला.

माजी आमदार पंकज भुजबळ यांच्या हस्ते बांधकाम कामगारांना सुरक्षा किट व संसार उपयोगी वस्तूंचे वाटप

महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागाच्या वतीने विविध योजनांचा लाभ कामगार व त्यांच्या कुटुंबीयांना मिळावा यासाठी मंत्री छगन भुजबळ यांच्या माध्यमातून येवला मतदारसंघात नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या नोंदणीकृत कामगारांना माजी आमदार पंकज भुजबळ यांच्या हस्ते विंचूर येथे बांधकाम सुरक्षा किट व संसार उपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 5 1 2 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे