जागतिक हृदय दिवस साजरा
अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल्स आणि रोटरी क्लब वेस्ट नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक हृदय दिवस साजरा
नाशिक – अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल्स आणि रोटरी क्लब नाशिक यांनी संयुक्तरित्या जागतिक हृदय दिवस साजरा केला. या विशेष कार्यक्रमात अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल्सचे तज्ञ डॉक्टर उपस्थित होते. कार्यक्रमात हृदय विकार तज्ञ डॉ. गिरीश बच्चव, डॉ. कांचन भांबरे, तसेच हृदय शस्त्रक्रिया तज्ञ डॉ. अजय हिरक्कनीवर यांनी महत्त्वाची माहिती दिली. आपत्कालीन विभाग प्रमुख डॉ. चेतन बीजवाल यांनी CPR आणि BLS ट्रेनिंग देऊन याबद्दल सविस्तर माहिती दिली.तसेच रोटरी क्लब नाशिक वेस्ट झोनचे अध्यक्ष आदित्य जाजू, सेक्रेटरी डॉ. नागेश डोलारे आणि मंजू सारसंनबी हे मान्यवर उपस्थित होते.
डॉ. चेतन बीजवाल यांनी CPR आणि BLS (Basic Life Support) ट्रेनिंग सत्राद्वारे उपस्थितांना तातडीने आवश्यक असलेल्या तंत्रज्ञानाची माहिती दिली.
डॉ. गिरीश बच्चव आणि डॉ. कांचन भांबरे यांनी हृदयाचे आरोग्य आणि त्याविषयी उपस्थितांच्या प्रश्नांची उत्तरे देऊन त्यांची शंका दूर केली. प्रशनोत्तरे सत्राद्वारे तज्ञांनी उपस्थितांची मनं जिंकली.
हृदय विकार शस्त्रक्रिया तज्ञ डॉ. अजय हिरक्कनीवर यांनी बायपास शस्त्रक्रियेत आलेल्या नवीन तंत्रज्ञानाबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले आणि शस्त्रक्रियेनंतर रुग्णांनी कोणती काळजी घ्यावी, यावर मोलाचे सल्ले दिले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विसपुते मॅडम यांनी केले, डॉ. नागेश डोलारे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अशोका मेडीकव्हर हॉस्पिटल आणि रोटरी क्लबचे विशेष आभार मानले