Breaking
ब्रेकिंग

गोंडेगावात कब्जा देण्यास विरोध; महसूल पथकाला दमबाजी, अधिकाऱ्यांसमोर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न; दहा जणांवर गुन्हा

0 4 5 5 0 9

गोंडेगावात कब्जा देण्यास विरोध; महसूल पथकाला दमबाजी, अधिकाऱ्यांसमोर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न; दहा जणांवर गुन्हा

किरणकुमार आवारे…

शिरवाडे वाकद :- कब्जा देण्याच्या कामासाठी गेलेल्या मंडळ अधिकाऱ्यांस टोळक्याने शिवीगाळ करत दमबाजी केली आणि अंगावर पेट्रोल टाकून पेटून घेण्याचा प्रयत्न करत स्वतः बरोबरच महसूल व पोलिस कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात घातल्याची धक्कादायक घटना गोंडेगाव ता .निफाड येथे घडली आहे. या प्रकरणी सायखेडा पोलीस ठाण्यात दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

       याबाबत मंडळ अधिकारी जयंत वसंत लिलके यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दिनांक १६ एप्रिल २०२६ रोजी दुपारी २.४५ ते ३.४५ दरम्यान ते त्यांच्या सहकाऱ्यांसह व पोलिस अधिकारी – कर्मचाऱ्यांसह गोंडेगाव शिवारातील गट क्रमांक १४, १७९, ४८, १३९, ७४, ७५, २१, २५, १७६, १६४ या जमिनींचा कब्जा देण्यासाठी गेले होते. यावेळी गट क्रमांक ४८ च्या बांधालगत रस्त्यावर आरोपी उत्तम किसन आगळे (रा.नाशिकरोड ) तसेच गोंडेगाव येथील अशोक पांडुरंग दाते, बाळासाहेब बापुराव दाते, किरण बाळासाहेब दाते, विनायक पांडुरंग दाते, रावसाहेब बाबुराव दाते, शंकर वसंतराव दाते, रमेश बापुराव दाते, संतोष रमेश दाते व एक अनोळखी व्यक्ती यांनी शासकीय कामात अडथळा आणत गोंधळ घातला. दरम्यान, बाळासाहेब बापुराव दाते यांनी प्लास्टिकच्या पाच लिटरच्या कॅनमधील पेट्रोल अंगावर ओतून घेतले, तर किरण बाळासाहेब दाते यांनी काडेपेटीने पेटविण्याचा प्रयत्न केला. तसेच अशोक पांडुरंग दाते व संतोष रमेश दाते यांनी फिर्यादीस एकेरी भाषेत धमकी देत “तुला पाहून घेऊ” असा दम दिला. या प्रकारामुळे उपस्थित महसूल व पोलीस अधिकारी – कर्मचाऱ्यांच्या जिवितास गंभीर धोका निर्माण झाला होता. संबंधितांचे हे कृत्य बेदरकार व शासकीय कामात अडथळा आणणारे असल्याने या प्रकरणी सायखेडा पोलीस ठाण्यात गु.र.न.६२/२०२६, भा.न्या.सं.

२०२३ चे कलम १३२, २८७, २८८, ३५१(२), ३(५) अन्वये सायखेडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हवा.प्रसाद सहाणे पुढील तपास करीत आहेत.

5/5 - (1 vote)

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 5 5 0 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे