आरोग्य व शिक्षणशैक्षणिकसत्कार
विंचूरचा विद्यार्थी अनुकल्प वानखडे रयत प्रज्ञाशोध परीक्षेच्या गुणवत्ता यादीत

0
3
2
1
2
3
कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय, विंचूरचा विद्यार्थी अनुकल्प वानखडे रयत प्रज्ञाशोध परीक्षेच्या गुणवत्ता यादीत
रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर विद्याप्रबोधिनी मार्फत रयत शिक्षण संस्थेतील प्रज्ञावान विद्यार्थ्यांच्या शोध घेऊन त्यांना अधिक मार्गदर्शन करण्यासाठी, दरवर्षी इयत्ता सातवीतील विद्यार्थ्यांसाठी रयत प्रज्ञाशोध परीक्षा आयोजित केली जाते सन 2024 -25 आयोजित परीक्षेत विद्यालयातील इयत्ता सातवीतील एकूण 52 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते त्यापैकी अनुकल्प अजय वानखेडे हा विद्यार्थी 200 मार्क पैकी 160 मार्क मिळवून गुणवत्ता यादीत आला आहे . या विद्यार्थ्याला विभाग प्रमुख पाटील ए एच व नागणे बी आर तसेच विषय शिक्षक निकम एम एस गणित, खोंडे एन सी समाजशास्त्र व सामान्य ज्ञान, आत्राम ए ए बुद्धिमत्ता, खरात ए जी मराठी, खरात एस ए इंग्रजी, जाधव व्हि पी विज्ञान यांनी मार्गदर्शन केले.
यशस्वी विद्यार्थी, त्याचे पालक, मार्गदर्शक शिक्षक व विभागप्रमुख यांचे रयत शिक्षण संस्थेचे व्हाईस चेअरमन भगीरथजी शिंदे, जनरल बॉडी सदस्य डॉक्टर सुजित गुंजाळ ,उत्तर विभागीय सल्लागार मंडळाचे सदस्य सुनील मालपाणी,विभागीय अधिकारी व सहाय्यक विभागीय अधिकारी,स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष पंढरीनाथ दरेकर, उपाध्यक्ष कैलास सोनवणे, जगदीश काका जेऊघाले ,अनिल दरेकर, सर्व सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती, शाळा व्यवस्थापन व विकास समिती, पालक शिक्षक संघ, माता पालक संघाचे सर्व कार्यकारिणी सदस्य, विंचूर व पंचक्रोशीतील ग्रामस्थ, पत्रकार, माजी विद्यार्थी, डॉक्टर असोसिएशन तसेच विद्यालयाचे प्राचार्य एन.ई.देवढे,पर्यवेक्षक के.जी.जोपळे, लाईफ मेम्बर आर.के.चांदे, सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.*
0
3
2
1
2
3