Breaking
आंदोलनगुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

बहुजन समाज पार्टी च्या वतीने मनमाडला धरणे आंदोलन

0 3 2 1 2 3

बहुजन समाज पार्टी च्या वतीने मनमाडला धरणे आंदोलन

नांदगाव, दि.2 (मुक्ताराम बागुल):- शहीद सोमनाथ सूर्यवंशी चा खून पोलिसांनीच केला याबाबत न्यायवैधानिक प्रयोगशाळा यांनी महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोग मुंबई यांना शव विच्छेदन अहवाल सादर केला असून सदरील अहवालात नमूद करण्यात आले आहे की, शहीद सोमनाथ सूर्यवंशी याचा पोलीस मारहाणीत मृत्यू झाला आहे. त्यामुळे नांदगाव तालुक्यातील मनमाडला समाज पार्टी नांदगाव विधानसभेच्या वतीने आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे.


महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेच्या अधिवेशनात खोटी माहिती दिली की सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू श्वसन क्रिया बंद पडल्याने झाला आहे. सदरील 120 गुन्हेगार पोलीस कर्मचारी, अधिकारी यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करून त्वरित अटक करण्यात यावी, परभणी मधील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूला व खुनाला पोलीस जबाबदार आहे. सोमनाथ सूर्यवंशी यांना परभणी जिल्ह्यातील नवा मोंढा पोलीस ठाण्यात अटकेपूर्वी जबरीची मारझोड करण्यात आली आहे. त्यातच शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला आहे. सदरील घटनाही कस्टोडियन डेथची असल्याने याचा तपास हा स्टेट सीआयडी मार्फत करणे बंधनकारक आहे. म्हणून शहीद भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मारेकरी पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा त्यांना अटक करून फास्टट्रॅक कोर्टात जलस्वामी घेण्यात येऊन आरोपी पोलिसांना फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी नांदगाव तालुक्यातील मनमाड येथे बहुजन समाज पार्टी नांदगाव विधानसभा तथा मनमाड शहर युनिट च्या वतीने धरणे आंदोलन दिनांक एक एप्रिल 2025 पासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा मनमाड जिल्हा नाशिक येथे करण्यात येत आहे.


यावेळी बहुजन समाज पार्टीचे नांदगाव विधानसभा अध्यक्ष दीपक गायकवाड, विधानसभा उपाध्यक्ष एस.एम. भाले, रामप्रसाद, कैलास गायकवाड, जयस्वाल, शालिग्राम निकम, बाळासाहेब आहेर, आप्पा चव्हाण, एजास शेख, बाळू खरे, श्रावण अहिरे, रवींद्र जगताप, सोमनाथ लहिरे, नारायण पाथरे, प्रवीण मोरे, विकी अहिरे, कैलास बाबा लहिरे, दयानंद साळवे, सागर त्रिभुवन, अशोक मोरे, विश्वास भंडारी, संजय साबळे आदी उपस्थित होते.
तर या आंदोलनाला रवी भाऊ गायकवाड, आर पी आय तालुकाध्यक्ष गुरु कुमार निकाळे, रवी निकम, सामाजिक कार्यकर्ते पापाबाई थॉमस, मोनीष चाबुकस्वार, अमोल लंकेश्वर, सिद्धांत पाटील, सुमित पाटील, गोपीभाऊ गरुड, आनंद अंकुश, उमेश झोडपे, मनोजभाऊ अंकुश, बंडू अहिरे, विकी सुरवसे, सागर बोरगे, पांडू पगारे, नरेंद्र जाधव, काशीबाई जाधव, पद्मा तायडे, रत्नागिरी केदारे, राजश्री सोनवणे नंदुरबार अहिरे आदींनी समर्थन देऊन सहभाग घेतला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 2 1 2 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे