ताहाराबाद येथील वाके नाला पुलाजवळ आढळला तरुणाचा मृतदेह
हत्या झाल्याचा संशय

प्रशांत कोठावदे
सटाणा : तालुक्यातील ताहाराबाद येथील वाके नाला पुलाजवळ एका तरुनाची हत्या करण्यात आली आहे. ताहाराबाद येथील वाके नाला येथे सकाळच्या सुमारास गावातील काही नागरिकांना एक तरुण मृत अवस्थेत आढळून आला. याबाबत जायखेडा पोलिसांना खबर देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठत पंचनामा केला असता तरुणाच्या कपाळावर काही हत्याराने वार करत हत्या केली असल्याचे निदर्शनास आले. मृत तरुणाच्या आजूबाजूला, खिशात मोबाईल व कुठलेही कागदपत्र आढळून आले नसून त्यांची अद्याप पर्यत ओळख पटलेली नाही. जयखेडा पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोद करण्यात आली असून पुढीत तपास पोलीस उपनिरीक्षक संदिप चेडे करीत आहेत.
सदर व्यक्तीचे वर्णन वय :
अंदाजे २५ ते ३० वर्ष उजव्या हाताच्या दंडावर नरसिंहाचे ट्याटो गोंधलेले
अंगात काळ्या रंगाचे जॉकेट, निळ्या रंगाची पॅन्ट, चॉकलेटी रंगाची अंडरपॅन्ट, सोनाटा कंपनीचे स्टील बेल्ट असलेले घड्याळ, स्टीलची गोल राउड अंगठी अश्या वर्णरणाचा इसम आपले गावात, शहरात हरविला असल्यास जायखेडा पोलीस ठाणे येथे संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.