आरोग्य व शिक्षणब्रेकिंगशैक्षणिक
विंचूरने उज्ज्वल निकालाची परंपरा कायम राखली

0
3
2
9
1
8
विंचूर विद्यालयाचा उत्कृष्ट निकाल
महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या फेब्रुवारी/ मार्च, 2025 मध्ये इयत्ता दहावीच्या परीक्षेत कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय विंचूरने उज्ज्वल निकालाची परंपरा कायम राखली. आज 13 मे, 2025 रोजी जाहीर झालेल्या एस.एस.सी. बोर्ड परीक्षेत विद्यालयाचा शेकडा निकाल 97.83 % इतका लागला. एस. एस. सी परीक्षेस विद्यालयातून 323 विद्यार्थी प्रविष्ट झाले. त्यापैकी 316 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून 149 विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळविले. तर 104 विद्यार्थी प्रथम श्रेणीत, द्वितीय श्रेणीत 49 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर 14 विद्यार्थी तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाले.
निकम पियूष ज्ञानेश्वर हा 93.80% मिळवून विद्यालयात प्रथम आला. कु. शेलार अक्षरा सुनील हिने 93.00 % मिळवत विद्यालयात दुसरा क्रमांक मिळविला. तर कु. निकम पल्लवी सोमनाथ हिने व दराडे कृष्णा संदीप या दोघांनी 92.60% मिळवत संयुक्तरित्या तृतीय क्रमांक पटकविला.
सर्व यशस्वी विद्यार्थी, त्यांचे पालक, मार्गदर्शक शिक्षक यांचे रयत शिक्षण संस्थेचे व्हाईस चेअरमन श्री. भगीरथजी शिंदे, जनरल बॉडी सदस्य डॉक्टर सुजित गुंजाळ, उत्तर विभागीय सल्लागार मंडळाचे सदस्य सुनील मालपाणी, विभागीय अधिकारी व सहाय्यक विभागीय अधिकारी, स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष श्री. पंढरीनाथ दरेकर, उपाध्यक्ष श्री. कैलास सोनवणे, सदस्य श्री. जगदीश जेऊघाले, श्री.बाळकिसन मालपाणी, श्री. गंगाधर जेऊघाले, श्री. अनिल दरेकर, शाळा व्यवस्थापन समिती, शाळा व्यवस्थापन व विकास समिती, पालक शिक्षक संघ, माता पालक संघाचे सर्व कार्यकारिणी सदस्य, विंचूर व पंचक्रोशीतील ग्रामस्थ, पत्रकार, माजी विद्यार्थी, डॉक्टर असोसिएशन तसेच विद्यालयाचे प्राचार्य एन. ई. देवढे, उपप्राचार्य श्री. वाबळे एस. एम, पर्यवेक्षक माळी एस. टी, पर्यवेक्षक के. जी. जोपळे, लाईफ मेंबर आर. के. चांदे, सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
0
3
2
9
1
8