Breaking
ब्रेकिंग

ज्ञानेश्वर पवार यांच्यासह विंचूर गटातील कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश

0 4 2 9 5 7

उबाठा शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर पवार यांच्यासह विंचूर गटातील कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश…

*मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत येवला संपर्क कार्यालयात प्रवेश*

*येवला, दि.१९ फेब्रुवारी :-* उबाठा शिवसेनेचे विंचूर गटातील माजी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर पवार यांनी आपल्या समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत आज जाहीर प्रवेश केला. येवला येथील संपर्क कार्यालयात राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ व माजी खासदार समीर भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला.

यावेळी ज्येष्ठ नेते अंबादास बनकर, पांडुरंग राऊत, विंचूरचे सरपंच सचिन दरेकर, विलास गोरे, जयंत साळी, सोहेल मोमिन, मोहसिन शेख, अनिल विंचूरकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी मंत्री छगन भुजबळ यांनी नव्याने प्रवेश केलेल्या सर्वांचे स्वागत करत सांगितले की, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी लढणारी आणि विकासाला प्राधान्य देणारा फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांवर चालणारा पक्ष आहे. आपण पक्षाची ध्येय धोरणे सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचवून पक्ष संघटन अधिक मजबूत करावे असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी विंचूर गटातील अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामपातळीवरील प्रभावी व्यक्तींनीही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश करून पक्षाच्या विचारधारेवर विश्वास व्यक्त केला. पक्षाच्या ध्येयधोरणांवर आणि विकासाभिमुख भूमिकेवर विश्वास ठेवून आपण हा निर्णय घेतल्याचे ज्ञानेश्वर पवार यांनी यावेळी सांगितले.

*यांचा झाला पक्षप्रवेश….*

माजी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर पवार, उबाठा शिवसेना गटप्रमुख नीलेश दरेकर, पदाधिकारी बापूसाहेब जाधव, विलास निकम, कुणाल सांगळे, राहुल कापसे, सुशील सोनी, योगेश सूर्यवंशी, गोकुळ कांगणे, ईश्वर गायकवाड, लखन कांबळे, शेखर गरड, मंगेश रणधीर, संदीप खांदोडे, गणेश रणधीर, सागर साळुंखे, सागर गरड यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 2 9 5 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे