Breaking
ब्रेकिंग

चोरट्यांचा शेळ्यांवर डल्ला, हनुमान नगर येथील ग्रामस्थ संतप्त

0 4 9 2 1 5

हनुमाननगरला शेळ्यांची चोरी

विंचूर ता.२ हनुमाननगर परिसरात रात्रीच्या वेळी वीजपुरवठा खंडित असल्याचा फायदा घेत चोरट्यांनी घरात झोपलेल्या राधाबाई शंकर सालगुडे यांच्या तीन मोठ्या शेळ्या चोरून नेल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. चोरी झालेल्या शेळ्यांची अंदाजे किंमत ४० ते ४५ हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले.

        राधाबाई सालगुडे या घरात झोपलेल्या असताना चोरट्यांनी त्यांच्या घराच्या दोन्ही बाजूंच्या दरवाजांना बाहेरून कड्या लावल्या. त्यानंतर गोठ्यात बांधलेल्या तीन शेळ्या चोरून नेल्या. सकाळी हा प्रकार लक्षात आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली.

      दरम्यान, रात्रीच्या वेळी हनुमाननगर परिसरात वीजपुरवठा बंद असल्यानेच चोरट्यांना अंधाराचा फायदा मिळाल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. महावितरण कंपनीने दिवसा आवश्यक असल्यास एक-दोन तास वीजपुरवठा बंद ठेवावा; मात्र रात्री अपरात्री वीजपुरवठा खंडित करू नये.

 हनुमाननगर परिसरात रात्री नियमित वीजपुरवठा सुरू ठेवण्याबरोबरच पोलिसांनी चोरीच्या घटनांना आळा घालावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 9 2 1 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे