ब्रेकिंग
विंचूर ग्रामपालिकेचे वार्डनिहाय आरक्षण जाहीर

0
4
7
3
9
4
विंचूर (प्रतिनिधी) – विंचूर ग्रामपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर १७ सदस्यांच्या जागांसाठी वार्डनिहाय आरक्षणाची सोडत जाहीर करण्यात आली. यापूर्वी सरपंचपदाचे आरक्षण घोषित करण्यात आले असून सरपंचपद अनुसूचित जमाती (पुरुष) प्रवर्गासाठी राखीव आहे.
आरक्षण सोडत गुरुवार, दि. ११ जून रोजी ग्रामपालिकेच्या सभागृहात आयोजित ग्रामसभेत पार पडली. निफाड पंचायत समितीचे विस्तार अधिकारी राजेश थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच ग्रामविस्तार अधिकारी रा. म. मगर आणि ग्राममहसूल अधिकारी आनंद गोटम यांच्या उपस्थितीत ग्रामस्थांसमक्ष लहान मुलाच्या हस्ते चिठ्ठीद्वारे सोडत काढण्यात आली.
जाहीर करण्यात आलेले वार्डनिहाय आरक्षण पुढीलप्रमाणे
वार्ड क्र. १ – नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला), सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण पुरुष
वार्ड क्र. २ – नागरिकांचा मागास प्रवर्ग (पुरुष), सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण पुरुष
वार्ड क्र. ३ – अनुसूचित जाती (पुरुष), अनुसूचित जमाती (पुरुष), सर्वसाधारण महिला
वार्ड क्र. ४ – अनुसूचित जमाती (महिला), सर्वसाधारण पुरुष
वार्ड क्र. ५ – नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला), सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण पुरुष
वार्ड क्र. ६ – नागरिकांचा मागास प्रवर्ग (पुरुष), सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण महिला
या आरक्षण सोडतीमुळे अनेक इच्छुकांच्या अपेक्षांवर पाणी फिरले असून काही इच्छुकांसाठी निवडणुकीची संधी निर्माण झाल्याची चर्चा गावात सुरू आहे.
0
4
7
3
9
4


