Breaking
निवड

रेखाताई रावणगावकर डोंगरे यांची आंबेडकरी महिला मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश महासचिव पदी निवड

0 1 5 1 2 1


रेखाताई रावणगावकर डोंगरे यांची आंबेडकरी महिला मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश महासचिव पदी निवड

इगतपुरी : संस्कार, संस्कृती आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार रक्तात भिनलेल्या रेखाताईनी समाजसेवेबरोबरच आपल्या कामाचा ठसा उमटवत महिला सक्षमीकरणसह अनेक क्षेत्रात उत्तम कामगिरी केली आहे. देवळाली मतदार संघाच्या विकासाचे स्वप्न पाहणाऱ्या रेखाताई रावणगावकर डोंगरे यांच्या कार्याची आंबेडकरी महिला मोर्चा आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चा यांनी दखल घेऊन महाराष्ट्र प्रदेश महासचिव पदी राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे यांनी नुकतीच नियुक्ती केली असून ११ तारखेला नागपूर येथे होणाऱ्या होणाऱ्या भव्य दिव्य सोहळ्यास त्यांना विशेष आमंत्रित करण्यात आले असून मान्यवरांच्या हस्ते यथोचित सन्मान करण्यात येणार आहे. त्याच्या निवडीबद्दल सर्वच क्षेत्रातून अभिनंदन होत आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे प्रेरणादायी विचार तळगळात पोहचवणार असून फुले शाहु आंबेडकरांच्या विचारांना पुढे घेवून जाणार असल्याचे रेखाताईंनी सांगितले. त्यांच्या निवडबद्दल इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, देवळाली मतदार संघातून महिला भगिनी, कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले. समाजात अनेक स्त्रिया सामाजिक चालीरीती, रूढी परंपरा यांच्या बंधनात अडकून मागे पडत आहेत. हे चित्र बदलण्यासाठी महिलांना प्रेरणा देण्यासाठी रेखाताई नेहमीच पुढे असतात. महिला सक्षमीकरण होऊन महिलांचा सर्वागीण विकास व्हावा उद्देश असल्याचे त्यानी सांगितले. कोरोना काळात त्यांनी कोरोंयोद्धा म्हणून भूमिका बजावली आहे. नेहमीच समाजाचे हित जोपासणारे सामाजिक उपक्रम राबवत असतात. शिका संघटित व्हा संघर्ष करा याप्रमाणे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी समाजाला उपदेश केल्याप्रमाने मुलांनी शिकले पाहिजे, शिक्षणच मनुष्याच्या समस्यांवर मात करू शकतो.अनेक बेरोजगार व्यक्ती आहेत त्यांनी हार न मानता स्व कर्तृत्वाने चांगला मार्ग अवलंबला पाहिजे. व्यसनाधीन न राहता कोणत्याही प्रकारच्या कामाची लाज वाटू न देता मिळेल ते काम करून समाधानी राहावे. अखेर संघर्ष करूनच यशाचा मार्ग नक्कीच गवसतो असे रेखाताई यांनी बोलतांना सांगितले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 5 1 2 1

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे