Breaking
अपघात

अयोध्यावरून परतत असणारी भाविकांची बस उभ्या ट्रकला धडकली, चार जणांचा मृत्यू

अनेक लोक जखमी

0 3 2 1 2 3

गाजीपूर मध्ये बारसेना परिसरात मुससेपूर गावाजवळ आज सकाळी भाविकांनी भरलेली बस थेट उभ्या असलेल्या ट्रकला धडकली. या भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक लोक जखमी झाले आहे.


पोलिसांना सूचना मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचली. युपीडा कर्मचारी आणि नागरिकांच्या मदतीने जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. बिहार मधील भोजपूर मधील करथा गावामधून आठ जूनला अयोध्या दर्शन करण्यासाठी श्रद्धाळूंनी भरलेली बस निघाली होती. अयोध्यामध्ये दर्शन, पूजापाठ केल्यानंतर ही बस बिहारच्या दिशेने परतत होती. पूर्वांचल एक्प्रेस-वे च्या मुससेपूर गावाजवळ पोहचली. पण बस चालकाला झोपेची गुंगी आल्याने त्याच्या ताबा सुटला आणि बस रस्त्याच्या कडेला असलेल्या ट्रेलवर धडकली.


ही धडक एवढी भीषण होती की, यामध्ये बसचा पुढचा भाग खूप खराब झाला. तर बस चालकाचा जागीच मृत्यू झाला. या भीषण अपघातात तीन जण तर एका महिला यांच्या जागीच मृत्यू झाला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 2 1 2 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे