Breaking
सत्कार

के.बी.मामा कुटुंबाचा आधारवड

0 4 7 2 1 4

के.बी.मामा कुटुंबाचा आधारवङ 

सागर निकाळे निफाङ प्रतिनिधी- 

माझे वडील वनसगाव ग्रुप विविध कार्यकारी सोसायटीचे माजी चेअरमन तसेच नाशिक जिल्हा कृषी औद्योगिक संघाचे मा. संचालक शैक्षणिक,राजकीय,सामाजिक आणि सहकाराचे जाणकार त्याचप्रमाणे उकृष्ट द्राक्षबागायतदार, आदर्श कुटूंबप्रमुख आदरणीय मा.श्री काशिनाथ भिकाजीराव शिंदे (आण्णा) यांचा आज (१३ एप्रिल )जन्मदिवस..

मा. श्री काशिनाथ भिकाजीराव पा. शिंदे

शिक्षण – DME (Diploma In Mechanical Engineer)

व्यवसाय -शेती

जन्म – १३ एप्रिल १९६७ वनसगाव, ता निफाड

आमच्या घरातील हा झंझावात आज ६० वर्षांचे झाले आहेत.. आयुष्याची ५९ वर्षे पूर्ण करून आज आपण ६० व्या वर्षांत पदार्पण करत आहात..सगळ्यांना आधार वाटणारे, सर्वांचे प्रॉब्लेम सॉल्वर असणारे, कोणत्याही संकटात पहाडासारखे उभे राहणारे, घरातल्या प्रत्येकाची सिक्रेटस् जपणारे, मॅनेजमेंटची उत्तम कला अवगत असणारे..त्यांच्या संपूर्ण व्यक्तिमत्त्व बद्दल सांगायचं झालं तर विशीतल्या तरुणाला लाजवेल अशी त्यांची शरीरयष्टी, आश्वासक चेहरा आणि अप्रतिम संवाद कौशल्य, विविधांगी अनुभव, कामाचा प्रचंड उरक आणि तितकेच वक्तशीर, हजरजबाबी पणा असणारे, कडक शिस्त अंगी बाळगणारे, आमच्या घरातील सर्वव्यापी आणि सर्वसमावेशक असणारे असे माझे वडील साठीच्या या टप्प्यापर्यंत ते स्वतः पेक्षा इतरांसाठीच जास्त जगलेत, जबाबदाऱ्या आणि अपेक्षांची सांगड घालत..त्यामुळे या पुढच्या काळात जसं तुम्हाला दीर्घायू लाभो तसंच मोकळेपणाने आयुष्य जगण्याची कलाही अवगत होवो हीच प्रार्थना..

१३ एप्रिल १९६७ सालचा आण्णाचा जन्मदिवस..एप्रिल मध्ये जन्मलेली लोकं खरंच खूप भाग्यवान असता.. त्यापैकी एक माझे वडील..त्या काळच्या एकत्रित कुटूंब पद्धतीत वाढलेल्या सर्वसामान्य जेमतेम परिस्थितीच्या पण खानदानी आणि संस्कारी कुटूंबातला जन्म..गरीबीचे चटके,वडीलधाऱ्या माणसांचा धाक,परिस्थिची जाण,आणि जन्मतः आई- वडिलांकडून प्रचंड संघर्ष करण्याची मिळालेली शिकवण,बाळकडू आणि संस्कार..नुकतच बालपण संपून जरा कळत्या वयाकडे प्रवास सुरु झाला यांतूनच तर गावच्या प्राथमिक शाळेतून जीवनात शिक्षणाचा श्रीगणेशा झाला कुठल्याही प्रकारचं शैक्षणिक वातावरण आणि पाश्वभूमी कुटूंबात नव्हती, डोळ्यात अनेक स्वप्न साठवून उच्च शिक्षणासाठी अनोळखी शहरात कॉलेज चे शिक्षण पूर्ण केले..त्या काळात पैसे आणि संसाधने कमी होती..पण मनात प्रचंड सकारात्मक ऊर्जा होती..वेगळं काहीतरी करण्याची जिद्द,धडपड,संघर्षदायी वारसा, नेतृत्वगुण कुठेतरी स्वस्थ बसू देत नव्हते. कुटूंबाची होणारी हालपेष्टा,गरिबी, वेळप्रसंगी पालखेड डाव्या कॅनल वरती रोजनदारीने आई वडीलानी केलेले अपार कष्ट जवळून बघितलेले,न परवडणाऱ्या शेती व्यवसायातून कुटूंबाला मुक्त करण्यासाठी उराशी बाळगलेलं स्वप्नातून..प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण पूर्ण झालं..बालपणापासून हुशार,चाणाक्ष, बुद्धिमान, त्यामुळे शैक्षणिक जीवनात गुणवत्तेच्या बाबतीत प्राथमिक शिक्षण ते डिप्लोमाच्या अंतिम वर्ष पर्यंत पहिला क्रमांक कधी सोडला नाही नुकतच शिक्षण पूर्ण करून नोकरीच्या शोधात असतानाच नंतरच्या काळात वडील आणि चुलते अश्या एकत्रित कुटूंब पद्धतीतून विभक्त झालो…वडील अशिक्षित होते पण प्रचंड मेहनती..भावंडांमध्ये मोठा.. नुकतंच शिक्षण पूर्ण करून..नोकरी लागलेली..साहजिकच कुटूंबाची जबाबदारी आण्णावर आली. त्यातूनच अर्धवट नोकरीचा राजीनामा देऊन शेती करण्याचं एक अवघड निर्णय घेतला..निर्णयावरती ठाम होते..कारण रक्तातच परिस्थिती बदलणारा आक्रमकपणा होता,दुरदृष्टी विचारचं भांडार होतं, शून्यातून विश्व निर्माण करण्याची ताकद होती, म्हणूनचं आजच्या सहस्थितीला जिव्हारी लागणारा कठीण निर्णय त्यावेळी आण्णांनी घेतला..मग शेती आणि कुटूंबाच्या जबाबदारीचा काळ सुरू झाला..

नियती आणि निश्यय यांच्या गुणाकारातून यशाची निर्मिती होत असते..बालपणापासून शेती व्यवसायाचा गाढा अभ्यास, शेतीची नाळ,आवड या गोष्टींनी परिणामी स्वतःची नोकरी सोडून शेती हाच आपला धर्म मानला..आण्णांच्या दूरदृष्टी विचारांनी व इतर भावंडांच्या (माझे काका आप्पा आणि भाऊ ) आणि कुटूंबाच्या साथीने त्यावेळची वडीलपोर्जित स्वतःच्या स्वमालकीची अल्प अशी शेतजमीन आणि एक साधं घर या गरिबीवर मात करत,बागायती शेती नंदनवन केली. योग्य नियोजन अचूक निर्णय सुसूत्रकामकाज या जोरावर आलिशान वास्तु बंगाला..त्याचबरोबर दुचाकी पासून तर हवाई सफारीचे स्वपन पूर्ण केले…द्राक्षशेतीचे क्षेत्र विस्तारित करून गटशेती, पाकीगहाउस, विहीर, बेदाना शेड, कांदाचाळ, शेततळे यासारख्या शेतीपूरक व्यवसायांना आणि कौटूंबिक गरजाना प्राध्यान्य दिले..ज्याची सुरुवात इमादारी, स्वकष्टातुन शून्यापासून होते त्यांना “हारण्याची,घाबरण्याची,ओळख निर्माण करण्याची” ‘गरज’आणि ‘भीती’नसते त्या गोष्टी आपोआप मिळतात आण्णांच्या बाबतीत जणू असेच काहीसे झाले…नंतरचा काळ हा कुटूंबाच्या भरभराटीचा सुरू झाला, जन्मापासूनच व्यापक दृष्टिकोन,दूरदृष्टी विचार,उच्चप्रत शिक्षणामुळे आणि बदलत्या काळानुसार काही गोष्टींची कौटुंबिक संसारात काळाची गरज वाटू लागली.त्यातूनच मुलांची शिक्षण, कुटूंबातील जेष्ठ व्यक्तींची आरोग्याची काळजी, शेती आणि शेतीपूरक व्यवसायाचा विस्तार, उच्चप्रत दर्जाच्या वास्तू यांसारखी ध्येय आणि उद्दिष्टे आजमितीला साकार झाली..यशाला शॉर्टकट पण नसतो..आणि उटर्न पण नसतो..यशाच्या जवळ घेऊन जाण्यासाठी ‘कष्ट’ हाच एकमेव पर्याय असतो..कष्ट प्रामाणिक असले की देव सुद्दा काही कमी पडू देत नाही..

माझी जडणघडण माझ्या वडिलांच्या कणखर संस्कारात आणि तेजोमयी विचारांच्या सावलीत होतेय याचा मला सार्थ अभिमान आहे..स्वभाव आणि शिस्तीच्या बाबतीत फार विलक्षण खुबी आण्णामध्ये मी आजवर जवळून बघत आलो आहे. इतरांना श्रेय,मान,सन्मान देण्याचा नम्रपणा त्यांच्या स्वभावात पानोपानी जाणवतो.चुकीला चुकी आणि बरोबर ला बरोबर म्हणण्याची त्यांची आक्रमक वृत्ती पण तितकाच हळवा स्वभाव…स्वच्छ,पारदर्शक आणि सुस्पष्टपणा हा त्याच्या व्यवहारी जीवनातील मूळ गुण. कोणताही प्रसंग असो वा संकट त्यावरती नियंत्रण मिळवणे,परिस्थिती हातळण्याचं अजब कौशल्य हजरबाबीपणा आणि मला सर्वात जास्त आकर्षणाचा भाग आण्णाच्या स्वभावातं करणारा काय असेल तर हा आगामी येणाऱ्या परिस्थितीचे योग्य असं नियोजन, त्यांच्या अंदाजाचा आणि गणिती आकडेमोडीचा मी स्पेशल फॅन आहे…त्याच्या स्वभावतला संयमीपणा मी गेली दोन वर्षे लॉकडॉऊन मध्ये घरी असताना, आणि माझ्या दीदीच्या लग्न प्रोसेस आणि आमच्या एकत्रित कुटूंबाचा विभक्तपणा मध्ये जवळून बघितला आहे सदैव सकारात्मक ऊर्जा देणारा तो हसरा चेहरा हेच आपल्या स्वभावतलं वेगळेपण बरंच काही शिकवत आहे. कुटूंबातील प्रत्येक व्यक्तीची मनधरणी करण्याचं, अनोळखी माणसांच्याही नजरेत चटकन स्वतःची ओळख निर्माण करण्याचं वेगळंच रसायन मी आण्णामध्ये आजवर बघत आलो आहे.अनेकदा या माणसातला देवमाणूस बघितला आहे…वर्तमान कितीही गुंतागुंतीच आणि जिकिरीचं असलं तरी येणारा दिवस आपलाच आहे असा प्रत्येक संकटावेळी “पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणणारे” आपणच आहात. नावात बरंच काही असतं. पाळण्यात नाव मिळतं,मोठ झाल्यावर मात्र ते कमवावं लागतं ही अमूल्यपूर्ण शिकवण आम्हा सर्वांना देत आहे…निफाड, लासलगाव, पिंपळगाव या तालुक्याचा मुख्य बाजरपेठेतील अवाढव्य व्यवसाय उभरलेले हार्डवेअर, फर्टिलाइजर, ज्वेलर्स ,फर्निचर, बँकिंग, बिल्डर,कॉन्ट्रॅक्टर, यंतकच नव्हे तर द्राक्षेबागेतील व्यापारी वर्ग यासोबत असलेले संबध आणि व्यवहारीक पद्धत मला दरवेळी काहीना काही शिकवते..मी अनेक वेळा खरेदी – विक्री , व्यवहार करताना आण्णा बरोबर फिरताना विचार करतो की कसं असं जमतं ना आण्णा ना..खरेदी विक्री,व्यवहारीक दृष्टिकोन, आणि मैत्रीपूर्ण सबंध..या त्रिसूत्री पणाचा माझ्या वडिलांचा मी प्रचंड फॅन आहे..मला हया ठिकाणी नमूद करायला खूप आनंद आणि आभिमान वाटतो त्यांच्या साधेपणा वरून कित्येकदा त्यांचे आणि माझे वाद देखील झाले पण आजतागायत पर्यंत साधेपणाचा गुण त्यांनी सोडला, कोणत्याही कामाची लाज, कमीपणा त्यांनी आजपर्यंत कधीच बाळगली नाही मी त्याचा स्वभाव उकळून जरी प्यालो तरी हुबेहूब व्यक्ती होऊच शकत नाही..ज्या तुलनेत त्यांनी आईवडील यांच्या संस्कारतुन भविष्यात स्वतःची उच्चप्रत प्रतिमा तयार केली त्याच कर्तव्यातून त्याचा योग्य सांभाळ देखील केला,करीत आहात…कधीच मला त्यांच्या या सांभाळत कमतरता,कंटाळा जाणवला नाही . वडिलांन इतकंच महत्व आणि आदर त्यांनी त्यांचे चुलते ज्यांनी त्यांना शिक्षणाचा मार्ग दाखवला कै कुशाबा सयाजी शिंदे आदरणीय (नाना) आणि सख्या बहिणी इतकंच चुलत बहिणींना दिल..आज ही देत आहे…ज्या बालवयात आई प्रमाणे सांभाळ करणाऱ्या नानी आजी ताई आजी याचं ही त्यांना आजही विशेष कौतुक आहे…खरी ही गोष्ट मी माझ्या वडिलांकडून शिकण्याचा प्रयत्न करतो आहे..मला या गोष्टीचं विशेष अप्रुप आणि कौतुक आहे..उपकार नाही म्हणता येणार पण कर्तव्य, आणि संस्कार काय असता हे त्यांच्या कडे बघून नक्की कळेल…इतरांच्या भावना जपता जपता स्वतः साठी कधी वेळ च दिला नाही..कोणच्याही नशिबाची कधीही बरोबरी करायची नाही वास्तव स्विकारायचे जेथे तुलना होते तिथे आपलेपण संपत, प्रेम कमी होत..मी किती मोठा हे भासवण्याचं हे जग..त्यात अशी माणसं सापडणं दुर्मिळच..जीवनात ज्या माणसाला लहान होता येत त्यालाचं विश्व व्यापात येत..या लहान पणाचा गुण मी माझ्या कळत्यावयापासून तुमच्यात बघतोय..तुम्ही नेहमी म्हणतात की आयुष्यात एकाध वळण घ्यायचं असेल ना…तर वळताना मागे इतकी चांगली आठवण ठेवावी की मागे वळून बघताना सर्व इतकं सूंदर दिसलं पाहिजे..आणि आज तुम्ही त्या टप्यावरती जगताय..

स्वतःची बागायती शेती भावांच्या साथीने उत्तमरित्या सांभाळून समाजकारणांचा वारसा चांगल्यापद्धतीने रुजवून आण्णांची १९९९ साली वनसगावच्या राजकीय क्षेत्रात एन्ट्री झाली त्याचेच उदाहरण १९९९ चे चेअरमन पद ते २०१६ च्या संचालक पदाच्या कार्यकाळात जिल्यात एक ‘आदर्श ‘आणि ‘स्वच्छ’ कारभार असणारी सहकारातील आणि नाशिक जिल्ह्यातील एकमेव संस्था म्हणून वनसगाव ग्रुप विविध कार्यकारी सोसायटीची आपल्या कार्यकाळात एक वेगळीच ओळख होती…ज्या माणसाने 16 वर्षे संस्थेत प्रामाणिकपणाने काम करत 15 माणसांना चेअरमन केलं, रोटेशन पद्धतीने स्वतः ची चेअरमनशिप दुसऱ्याला दिली. स्वतः मात्र एकदाचं चेअरमन झाले..अनेक चेअरमन होतील जातील पण संस्थेच्या भव्य दिव्य इमारतींवर भविष्यात पण तेच नाव सोनेरी अक्षराने लिहलं जाईल इतकं दिशादर्शक काम त्यांनी केलं आहे…म्हणूनच गावाने आयुष्य भरासाठी त्या माणसाला “चेअरमन” ही पदवी बहाल केली…हे वैभवफार कमी लोकांच्या वाट्याला येत.. त्या पैकी आण्णा एक..*लआजमितीला संस्थेची काय अवस्था झाली आहे हे काही सभासदांना नव्याने सांगण्याची गरज नाही..आपल्या नेतृत्वामूळे आणि याच सहकारातील अनुभवाच्या जोरावर संचालकपदाच्या दुसऱ्या पंचवार्षिक टर्म मध्ये आपल्याला नाशिक जिल्हा कृषी संघाच्या “संचालक” आणि “तज्ञ संचालक” होण्याचा मान मिळाला तो केवळ आपला सहकारातील अनुभव आणि जिल्यातील अग्रगण्य आदर्श संस्थेचे नेतृत्व आपण करत होता आपली तालुक्यातील लोकप्रियता,मधुर वाणी,शब्दनिष्टता नेतृवगुणाच्या जोरावर आपली “तज्ञ संचालक” म्हणून नियुक्ती झाली…हे सर्व करत असताना एक आदर्श कुटूंबप्रमूकाची धुरा यशस्वी रित्या आपण सांभाळत आहात..निफाड तालुक्याच्या राजकारणात स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करण्याकरता आण्णा कडे सर्व गोष्टी मुबलक होत्या. राजकीय पार्श्वभूमी,जनमताचा पाठिबां, नेतृत्वगुण परंतू आण्णानी पद,प्रतिष्ठा,सत्ता, पैसा,मोठेपणा याचा उभ्या आयुष्यात आजपर्यंत कधीच बाहू केला नाही..

राजकारणाच्या बाजारीकरणात आण्णा मागे असले तरी समाजकारण आणि स्नेहभाव राजकराच्या पलीकडे जाऊन कितीतरी पट अधिक जपणारे आण्णा जनतेच्या मनातील घर बनले..माझ्या वडिलांचं त्यांच्या स्वतः च्या व्यवहारिक जीवनातील एक फार सूंदर तत्व आहे..आणि ते आजही त्या वरती ठाम आहे..ते व्यवहारात खूप पारदर्शक आहेत..एकत्रित कुटूंबाचे आणि एका उत्कृष्ट सहकारी संस्थेचे प्रमुख होते पण या माणसाने कधीच आर्थिक व्यवहारात कधीच स्वतःचा स्वार्थ साधला नाही..भले (नातलग भाऊबंद) अनेकांशी वैर पत्करले..विभक्त झाल्यानंतर अनेकांनी आप आपल्या जागा सेप केल्या..असो..ते मात्र तसू भरही आपल्या भूमिकां आणि तत्व पासून हलले नाही..रात्र-दिवस कष्टाने कमवलेला पैसा चुकीच्या ठिकाणी व्यर्थ झालेला त्यांना आजपर्यंत कधीच सहन झालेला नाही..नात्यात व्यवहार आणि व्यवहारात नातं कधीही त्यांनी आणल नाही..काळासोबत प्रगती होतं गेली तशी ती अनेकांना पचनी पडत नव्हती मग त्यातूनच काही समाजकंटकांनी आण्णांच्या चांगुलपणाचा फायदा घेत राजकिय आणि आर्थिक धोके दिले..भाऊबंदकीत गद्दारकी करत आपली स्वतंत्र राजकीय पोळी भाजण्याचे कामे केली..एक काळ असा होता यांचा की यांनां आण्णांनी उभं केलं नाही तर ही लोकं केव्हाच संपली होती, गावात यांना कुत्रं उभं करत नव्हतं ती शेमडी पोर पाटीलकी करायला लागली, आण्णांनी आपली म्हणून यांना आधार देत ही लोक मोठी केली..मदतीची आणि उपकाराची जाणीव ठेवणारे असता हे माहिती होत पण..त्याच मदतीच्या हातावर, धीर दिलेल्या खांद्यावर आणि पाठीत वार करणारे ही असता हे पण शिकायला मिळालं.. सरड्या प्रमाणे रंग बदलणारी आणि दुसऱ्याच्या पंक्तीत बुंदी वाढणारी काही लोक आण्णांना त्यांच्या 16 वर्षे च्या राजकीय जीवनात भेटली..निष्ठावंत शिवसैनिक माहिती होते पण..स्वार्थासाठी भगवा मिरवणारी आणि ज्या पंक्तीत गुलाबजाम तिथे जाऊन बसणारे, निष्ठावंत आण्णांनी पहिल्यांदाच बघितले..खाल्या मिठाला न जगणारे हीच तुमची ओळख..आईवडीलाचे “कष्ट” आणि “संस्कार” टिकवण्यासाठी विभक्त होऊनही एकमेकांनासाठी जीव की प्राण देणारे भाऊ असलेलं कुटूंब आणि राजकिय स्वार्थासाठी एकत्रित येणार कुटुंब संपूर्ण गावाने बघितलं…मागे निवडणुकीच्या माध्यमातून अनेक हौश्या गौश्यानी नको ते आरोप केले (आजही माझ्या कडे ते रेकॉर्ड आहे) मग ज्याची लायकी पण नाही ते पण बरच काही बोलून गेले..कुटूंबाचे संस्कारानी आम्हाला आमची मर्यादा सोडता आली नाही.. भक्कम पणाने आण्णांनी उभा केलेला जनसंपर्क, ताकद, प्रतिष्ठा, प्रगती बघवत नसलेल्या क्रूर प्रवृत्तीच्या लोकांनी सगळी ताकद वापरूनही न संपणाऱ्या आण्णाना राजकारणातून संपवण्यासाठी केवळ याचं महाशय लोकांनी नंतर कट कारस्थान करून जीवघेणी हल्ले करणारी दळभद्री लोक पुढे केली या वरूनच यांची किती निच्च नीतिमत्ता आहे हे कळलं..सत्ता हे याचं उदरनिर्वाह करण्याचं प्रमुख साधन होत आणि आहे त्यासाठी यांनी रात्रंदिवस एक करून भावा-भावांमध्ये कलह निर्माण करून देणे, भाऊबंदकी-वाडा फोडले, वेगवेगळी आमिष दाखवने, हे करूनही न संपणाऱ्या लोकवरती जीवघेणी हल्ले केली, कौटुंबिकअडथळे निर्माण करून, सख्या भावा विरुद्ध भाऊ उभा करून, चुकीची पब्लिसिटी आणि सभासदांना आर्थिक संसाधने वापरून 16 वर्ष सुसंस्कारीत राजकारणाची पायमल्ली केली आणि सत्ता मिळवली कधीकाळी सोन्याची अंडी देणारी कोंबडी असलेल्या जिल्यात नावलौकिक मिळवलेल्या सरकारी संस्थेला कर्जबाजारी करून या लोकांनी कापून खाल्लं..पण नियती खुप काळ हे टिकू देत नाही..असो..वडिलांच्या केवळ सल्ल्या वरती मोठी झालेली लोकं मी बघितलीय बघतोय..भारतीय संस्कृतीत पैश्याप्रमाणेच शब्दलाही अन्यसाधारण महत्व आहे आणि तो जपणारे कितीतरी विश्वासू लोक आण्णांनी जोडली आणि जपली..कारण आईवडिलांचे संस्कारातच शिकवण होती शब्द जपण्याची..2000 ते जवळपास 2015 या काळात अनेक शेतकरी आणि सर्वसामान्य कुटुंबातील मुलांकरिता उच्चशिक्षणासाठी आर्थिक मदत करत अनेक इंजिनिअर, डॉक्टर, फार्मासिस्ट, आपण घडवले आज ही ती मुलं गर्वाने आपलं नाव घेतात..

भरारीच्या काळात संघर्षाचा भूतकाळ विसरायचा नसतो याच मूर्तिमंत उदाहरण म्हणजे माझे आजोबा आण्णाचे वडील स्व. भिकाजी सयाजीराव शिंदे (तात्याबाबा) अतिशय संघर्ष आणि गरिबीतून आमच्या कुटूंबाची पायाभरणी खरी आजी आणि बाबाच्या रूपांनी झाली. १० नोव्हेंबर २०२० रोजी सायंकाळी ०७ वाजून ०७ मिनिटानी बाबांना देवाज्ञा झाली…बाबां वयाच्या ८६ व्या वर्षापर्यंत अगदी भरभरून जगलात…कष्टरुपी जीवनातून अगदी तुम्ही सोन्यासारखं कुटूंब घडवलं तुमच्या आठवणी, प्रत्येक कामातील रंजक किस्से असो की जीवनाचा संघर्षमयी काळ सांगता सांगता दिवस – रात्र कमी पडतील इतकं ते शिस्तप्रिय जीवनाचे असंख्य दाखले मी अनेकांच्या बोलण्यात ऐकले आहे..बाबा तुमच्या या समर्पित जडणघडणीत आपलं कुटूंब आजपर्यंत वाढत आलं…आणि निश्चिंतपणाने यापुढेही आयुष्यभर तुमच्या कार्याचा वसा आणि वारसा समर्थपणाने भावी काळात आम्ही अखंडपणे चालवू. एक काळ होता की जगणे मुश्कील व्हावे इतके ते दुःख होते..काळाच्या ओघात संघर्ष आणि गरीबीचे चटके सोसत- सोसत प्रामाणिक कष्टरुपी जीवनातून आजमितीला आयुष्यात असे दिवस आले की नजर लागावी इतका तो आनंद निर्माण झाला..या प्रचंड प्रगती आणि यशमागे तात्याबाबा आणि काकूआजी नावाचा संघर्षदायी किनारा आहे..

आजच्या तिथीस आपण 60 व्या वर्षात पदार्पण करत आहात जीवनाच्या वाटेवर आपण अनेक संकटाना सामोरे गेला. मग ती राजकीय,सामाजिक पार्श्वभूमी असो अथवा कौटुंबिक या सर्वच गोष्टीत आपण मन जिकलं…प्रचंड अशी होणारी आपली कौटुंबिक आणि राजकीय जीवनातील प्रगतीच्या वाटेत अनेकांनी काटे टाकण्याचे प्रयत्न केले, मग ते तुमच्या राजकीय प्रवासाची असो की आपल्या कुटूंबाच्या प्रगतीविषयी, नेहमीच गावच्या कट्टा वरती चर्चा असो कौतुकानं आणि चांगल्या विचाराने बघणाऱ्याची संख्या नेहमीच जीवनात लढण्याची जिद्द देत आली आहे.जोपर्यंत तुम्ही दुसऱ्याबद्धल प्रेम,आपुलकी आणि इतरांची प्रगती, विकास पचवण्याचं सामर्थ्य निर्माण करत नाही तोपर्यंत प्रगती होणं शक्य नाही..एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा बोचरा आनंद कधीच व्यक्त करता येत नाही..म्हणून नेहमी दुसऱ्याच्या आनंदात स्वतःचा आनंद मानायला शिका भविष्यकाळ निश्चितपणे तुमचा उज्ज्वल असेल.माझ्या कळत्या वयापासून ह्या वाक्याचं अनुकरण मी आण्णामध्ये आजवर बघत आलो आहे. ते म्हणता ना “देव तारी त्याला कोण मारी “याच प्रमाणे आपले आयुष्य सोनेरी झाले..बालपणापासून एकच जिद्ध होती की हाती घेतलेल्या रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर करेल आणि ते आता झालं…”खरंच पेरल तेच उगवत” या वाक्यप्रमाणे आपले जीवन घडलं….खूप बीकट परिस्थितून,काबाडकष्टातून सोनं कमंवल…आपण कोट्याधीश झाला याच आम्हाला मनस्वी आनंद..

वयाची 59 वर्ष पूर्ण करून आज 60 व्या वर्षात आपण पदार्पण करत आहात..या टप्यावरती आयुष्यात मागे वळून बघतांना बालपण, शिक्षण, नोकरी, व्यवसाय, समाजकारण आणि यशस्वी कुटूंबप्रमुख अश्या खूप वेगवेगळ्या भूमिका आपण साकारल्या आणि त्यात उत्तम यशही मिळवलं नियतीनेही तुम्हाला खूप भरभरुन दिलं..आजवरच्या आपल्या करीअर चा ग्राफ कुणालाही हेवा वाटावा असाच राहिलेला आहे..परंतु उर्वरित आयुष्य आपण स्वतःसाठी जगावं ही मनापासून इच्छा..उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो, हीच बाप्पा चरणी प्रार्थना..तुमच्या आयुष्यात आनंद असाच बहरत राहो..

वडिलांच्या संघर्षाला मी स्वप्नपुर्तीच दान करेन..

मातीला ही होईल गर्व आभाळ ही आभिमान करेल..

आणि नको मला इमारत कुठली प्रेमाची निशाणी म्हणून..

मी माझ्या वडिलांसाठी आयुष्यभर ताठ मानेने जगण्याचा आभिमान निर्माण करेल..

औक्षवंत व्हा..शतायुषी व्हा..आण्णा..

शब्दांकन कुणाल शिंदे वनसगांव

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 7 2 1 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे