क्रिडा व मनोरंजनब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक
‘चक्रवर्ती सम्राट पृथ्वीराज चौहान’ मालिकेत राजा सोमेश्वर या आपल्या व्यक्तिरेखेचा शेवट होत असल्याने रोनित बोस रॉय भावुक झाला
0
4
2
9
5
7
अभिनेता रोनित बोस रॉय आणि ‘चक्रवर्ती सम्राट पृथ्वीराज चौहान’ च्या चाहत्यांसाठी एक भावुक क्षण आला आहे, कारण कथानकाच्या ओघात राजा सोमेश्वर या दमदार आणि सन्मान्य पात्राला निरोप देण्याची वेळ आली आहे. राजा सोमेश्वरची भूमिका रोनित बोस रॉय करत आहे. आपली प्रभावी उपस्थिती आणि अभिनयातील बारकावे यांच्या बळावर रोनितने हे पात्र पडद्यावर जिवंत केले आहे आणि कथानकाला सखोलता आणि गांभीर्य देऊन प्रेक्षकांचे मन जिंकून घेतले आहे.
कर्तव्य, नियती आणि पुत्रप्रेम यांच्यात अडकलेल्या राजा सोमेश्वरची व्यक्तिरेखा उत्तम साकारून रोनितने मालिकेवर आपली छाप सोडली आहे. आता कथानकात राजा सोमेश्वराचा अकाली मृत्यू होऊन पृथ्वीराज चौहानच्या जीवनात नवीन अध्यायाची सुरुवात होणार आहे.
राजा सोमेश्वर ही व्यक्तिरेखा साकारण्याचा अनुभव सांगताना रोनित म्हणतो, “राजा सोमेश्वरही भूमिका करणे हा माझ्या करकीर्दीतील एक खूप समाधानकारक अनुभव होता. राजा सोमेश्वर म्हणजे केवळ मुकुट किंवा भरजरी पोशाख नाही, तर एक पिता, शासक तसेच कर्तव्य आणि भावनेच्या ओढाताणीत सापडलेला माणूस अशी व्यक्तिरेखा आहे. मी प्रत्येक दृश्यात जीव ओतण्याचा प्रयत्न केला आणि आता कथानकात पुढे काय होणार याची उत्सुकता मलाही लागून राहिली आहे. मी अनेक आठवणी, धडे आणि प्रेम सोबत घेऊन मालिकेचा निरोप घेत आहे. मी समस्त टीमसाठी यश चिंततो आणि आशा करतो की, ही मालिका उत्तरोत्तर अधिक लोकप्रिय आणि यशस्वी होईल.”
बघा, ‘चक्रवर्ती सम्राट पृथ्वीराज चौहान’ सोमवार ते शुक्रवार रात्री 7.30 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन आणि सोनी लिव्हवर
0
4
2
9
5
7



