Breaking
ब्रेकिंगसामाजिक

आगीत खाक झाला संसार,, “माणुसकीने” दिला त्यांना आधार

0 3 2 1 2 3

*धारणगांवला माणुसकीचं दर्शन….*

निफाङ प्रतिनिधी- 

नियतीच्या दरबारात कोणता दिवस कसा उगवेल सांगता येत नाही .भरदुपारी लागलेल्या आगीमुळे धारणगांव खडक येथे अकरावड वस्ती दोन आदिवासी कुटुंबाच्या झोपडया जळुन खाक झाल्या.कसाबसा उदरनिर्वाह करुन रोजंदारी करणारे संसार रणरणत्या उन्हात उघडयावर पडले…मदतीच्या अपेक्षित असलेले हिरमुसलेले चेहरे काळवंडुन गेले माञ लोकांनी आपापल्या परीने हातभार लावायला सुरूवात केली..काल राञी दहा वाजता सदर घटनेची माहिती माणुसकी फाऊंडेशन निफाड चे संस्थापक अध्यक्ष सागर निकाळे ह्यांच्या ह्यांच्या कानावर पडली.आणि सकाळी आठ वाजता धारणगांव खडक येथे येऊन सदर आदिवासी कुटुंबाची विचारपुस केली.त्यांना लागणारे कपडे तसेच जिवनावश्यक वस्तुंची मदत करुन आपल्यातल्या माणुसकीचे दर्शन घडवले.

धारणगांव खडक येथील अकरावड ह्या ठिकाणी दुपार च्या सुमारास आगीत 2/3झोपड्या जळुन राख झाल्या ..श्री.बापु चंद्रभान माळी

श्री.नंदु गंगाराम सोनवणे ह्यांच्या घरातील धान्य ,किराणा भांडे तसेच कागदपञे,मोटसायकल , फवारणी चे पंप ,दागिने तसेच इत्यादी साहित्य पुर्णता जळुन गेल्याने सदर कुटुंबाचे संसार उघड्यावर पडले आहेत .फक्त अंगावर असलेल्या कपड्यांव्यतिरिक्त कुठलाही आधार उरला नाही .शासकीय पंचनामा केलेला असुन मा.तलाठी साहेब, ग्रामविकास आधिकारी तसेच पोलिस पाटील तसेच गावातील काही ग्रामस्थांनी तात्काळ मदत म्हणुन आपापल्या परीने कुणी पाचशे कुणी हजार कोणी दोनशे…जशी शक्य होईल तशी तात्पुरत्या स्वरुपात मदत केलेली . परंतु सदर कुटुबांना आपल्या अजुन मदतीची गरज होती ..जे कुणीही इच्छुक असतील त्यांनी आपआपल्या परीने मदतीचा हात ह्या कुटुंबास द्यावा..असे अवाहन माणुसकीच्या नात्याने करण्यात आले होते…वेळ कुणावरही येते माञ माणुसकीचा आपला किंचित सा प्रयत्न ही कोलमडलेल्या उभा करण्यास सहाय्य ठरतो..

नुसतीच हळहळ व्यक्त न करता संकटकाळात दुर्बल पिडीत शोषितांसाठी आहोराञ प्रयत्न करणारे सागर निकाळे ह्यांनी सदर कुटुंबांचे पुनर्वसन कसे होईल ह्यासाठी संपुर्ण प्रयत्न करण्याचे आश्वासन ह्या प्रसंगी व्यथित कुटुंबास आधार देत केले.तसेच माणुसकी फाऊंडेशन निफाड कडुन भविष्य काळातही काही मदत लागली ती करण्यासाठी आम्ही तत्पर आहोत ..असे ह्याप्रसंगी सांगितले..

ह्याप्रसंगी धारणगांव खडक चे पोलिस पाटील राहुल सोनवणे. एकलव्य संघटनेचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख रामेश्वर माळी.रविंद्र आहीरे.अमजदभाई ह्यांनी माणुसकी फाऊंडेशन च्या माणुसकीच्या कार्याबद्दल आभार व्यक्त केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 2 1 2 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे