आषाढी वारीच्या निमित्ताने जगदीश चव्हाण यांचे माऊली निघाले विठुस भेटाया..हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला..
विंचूर (प्रतिनिधी) –
माऊली निघाले विठूस भेटाया |
माऊलीचा वारसा वारकरी अपुला ||
विंचूर येथील टॅक्सी चालक विजय चव्हाण यांचा सुपुत्र ‘इंडियन आयडॉल’ मराठी उप विजेता, झी वाहिनीवरील ‘युवा सिंगर एक नंबर’ हा सगळा प्रवास आपल्या गायनाच्या जोरावर संघर्षमय करत शिखर गाठलेला आणि आज त्यांचे आषाढी वारी निमित्य प्रसिद्ध झालेले भक्ती गीत असे सर्वांचे चाहते जगदीश विजय चव्हाण.
आजची परिस्थिती जेमतेम असताना आपल्या प्रतिमेच्या जोरावर बंजारा समाजातील जगदीश चव्हाण ह्या युवकाने आपल्या सुरेल आवाजामुळे आतापर्यंत भक्ती गीते, बॉलीवूड तसेच पॉप गाणे गाऊन प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
जेमतेम हातावरची परिस्थिती असतांनाही आपल्या गायनाच्या जोरावर संघर्षमय प्रवास करीत, जगदीश यांनी यशाचे शिखर गाठले. जगदीश ला गायनाबरोबर अभिनयाची आवड असल्याने या क्षेत्रातही नशीब आजमावून पहात आहे. त्याने ‘विजयी भव’ या चित्रपटात गायना बरोबर नायकाची भूमिका केली असून, अजय- अतुल यांच्या समोर गायनाची संधी त्यांना मिळाली. आज प्रसिद्ध झालेले यांचे हे भक्ती गीत
jagdishchavan oficial
या चॅनेल वर जाऊन सर्वांनी ऐकून त्याचा आनंद घ्यावा..