सामाजिक
मनमाड येथे भीमत्सोव 2025 चे आयोजन

0
3
2
1
2
3
मनमाड येथे भीमत्सोव 2025 चे आयोजन
नांदगाव, दि.5 (मुक्ताराम बागुल):- भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने नांदगाव तालुक्यातील मनमाड येथे भीमत्सोव 2025 कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवात विविध प्रबोधनात्मक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश करण्यात आलेला आहे. यामध्ये प्रसिद्ध खंजिरी वादक शाहीर मीरा उमप, व्याख्याते डॉक्टर नागेश गवळी, भूषण पगारे, नाटक लोकशास्त्र सावित्री आणि महानाट्य भीमा तुझ्या जन्मामुळे यासारख्या कार्यक्रमांचा समावेश आहे. मनमाडकरांना या कार्यक्रमांचा एक प्रबोधनात्मक अनुभव मिळणार आहे. या भीमत्सोवाची महात्मा फुले यांच्या जयंतीदिनी होणार आहे. जो कार्यक्रमाचे एक विशेष प्रारंभ ठरेल.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने भिमत्सोव 2025 या उत्सवाची सुरुवात महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त अकरा एप्रिल पासून ते 17 एप्रिल पर्यंत विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. दिनांक 11 एप्रिल रोजी सायंकाळी सात वाजता मनमाड शहरातील एकात्मता चौकात “लोक-शास्त्र सावित्री” हे नाटक सादर करून भीमत्सवाचे उद्घाटन केले जाईल. याच दिवशी सकाळी भारतीय संविधान या विषयावर व्याख्याते भूषण पगारे यांचे व्याख्यान होईल. दिनांक 12 एप्रिल 2025 रोजी सायंकाळी 7 वाजता एकात्मता चौकात “शिवराय ते भिमराय” या विषयावर नागेश गवळी यांचे व्याख्यान होईल. दिनांक 13 एप्रिल 2025 रोजी रात्री 12 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात येईल.
तसेच 14 एप्रिल 2025 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळात पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येईल. दिनांक 16 एप्रिल 2025 रोजी सायंकाळी 7 वाजता मनमाड येथील एकात्मता चौकात प्रसिद्ध खंजिरी वादक मीराताई उमप यांचा आंबेडकरी गीतांचा कार्यक्रम होईल. त दिनांक 17 एप्रिल 2025 रोजी सायंकाळी 7 वाजता पोलीस परेड ग्राउंडवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित ,”भीमा तुझ्या जन्मामुळे” हे महानाट्य सादर होणार असल्याची माहिती भिमोत्सव आयोजन समितीचे दिनकर धीवर, अमोल खरे, संजय कटारे, निलेश वाघ, प्राध्यापक डॉक्टर जालिंदर इंगळे आदींनी दिली.
0
3
2
1
2
3