सत्कार
विंचूरच्या रिक्षा चालकाचा प्रामाणिकपणा

0
4
7
2
1
4
विंचूर दि.१० (प्रतिनिधी) आजच्या युगात माणुसकी व प्रामाणिकपणा अभावानेच दिसून येतो. मात्र काही लोक आजही प्रामाणिकपणे वागून समाजा समोर आदर्श निर्माण करतात. येथील रिक्षा चालक चंद्रकांत सुर्यवंशी यांचे गेल्या आठ दिवसांपूर्वी पाच हजार रुपये हरवले होते. मात्र त्यांच्या लक्षात येत नव्हते की पैसे नेमके पडले कुठे. तर योगायोगाने दुसरे रिक्षा चालक गोकुळ ठुबे यांना येथील प्रभू श्रीराम चौकात एका कॅरी बॅग मध्ये गुंडाळलेल्या अवस्थेत पाच हजार रुपये सापडले. ते त्यांनी आहे त्याच स्थितीत सांभाळून ठेवले व कोणी पैशांची शोधाशोध करत येईल याची वाट बघत दररोज खिशात बाळगत होते. दरम्यान आठ दिवसांनी चंद्रकांत सुर्यवंशी व गोकुळ ठुबे यांची येथील रिक्षा स्टँडवर भेट झाली. त्यावेळी चंद्रकांत सुर्यवंशी हे जरा नाराज असल्याचे गोकुळ ठुबे यांना जाणवले.तेव्हा ठुबे यांनी सुर्यवंशी यांना नाराजीचे कारण विचारले असता सुर्यवंशी यांनी माझे पैसे हरवल्याचे सांगितले. तेव्हा ठुबे यांनी पैसे किती होते.कशात होते.याची खातरजमा करून सुर्यवंशी यांना पाच हजार रुपये परत करुन प्रमणिकपणा व माणूसकीचे दर्शन घडविले.
मला सापडलेले पाच हजार रुपये हे कोणाचे तरी कष्टाचे पैसे असतील.ज्याचे पैसे हरवले त्याला आठ दहा दिवस कष्ट करावे लागले असतील. याची मला जाणीव आहे. कारण आम्ही दिवसभर रिक्षा चालवतो तेव्हा कुठे पाच सातशे रुपये कमावतो. त्यामुळे मी गेले आठ दिवस कोणी शोध घेत रिक्षा स्टँड पर्यंत येईल.याची वाट बघत होतो.
गोकुळ ठुबे
रिक्षा चालक विंचूर
0
4
7
2
1
4
