Breaking
आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

नाशिकमध्ये ओएसिस फर्टिलिटी कडून मोफत फर्टिलिटी शिबिराचे आयोजन

0 3 2 9 1 9

ओएसिस फर्टिलिटी कडून नाशिकमध्ये मोफत फर्टिलिटी शिबिराचे आयोजन

वंध्यत्वावरील(इन्फर्टिलिटी) उपचार अधिक सहज आणि उपलब्ध व्हावेत यासाठी आयोजित या शिबिराद्वारे इच्छुक जोडप्यांना एक्स्पर्ट कंसल्टेशन, सवलतीच्या दरात उपचार व विज्ञान आधारित उपाय दिले जातील.

नाशिक– पालकत्वाच्या प्रवासात पुढे जाण्याची इच्छा असलेल्या जोडप्यांना आधार देण्याच्या उद्देशाने, ओएसिस फर्टिलिटी नाशिकमध्ये 9 जून ते 12 जून 2025 दरम्यान मोफत फर्टिलिटी शिबिर आयोजित करत आहे. हे शिबिर दररोज सकाळी 9:30 ते सायंकाळी 8 या वेळेत ओएसिस फर्टिलिटी, 4 था मजला, वेदाज स्पेसेस अपार्टमेंट, जय मातादी शोरूमच्या वर, गोविंद नगर, नाशिक येथे होणार आहे.

या उपक्रमाचा उद्देश वंध्यत्वाच्या समस्यांबाबत जनजागृती करणे, अनुभवी फर्टिलिटी तज्ञांकडून वैयक्तिक सल्ला, तपशीलवार मूल्यांकन आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून वैयक्तिकृत वैद्यकीय माहिती देणे आहे. जीवनशैली आणि आरोग्याच्या बदलत्या स्थितींमुळे वंध्यत्वाच्या समस्या वाढत आहेत. अशा वेळी हे शिबिर काळाची गरज असून, सहानुभूतीपूर्वक काळजीसह अत्याधुनिक आणि परवडणारे वैज्ञानिक उपचार(रिप्रॉडक्टिव्ह मेडिसिन) देणारी ही एक उपयुक्त संधी ठरणार आहे.

या चार दिवसांच्या शिबिरादरम्यान सहभागी होणाऱ्यांना अनेक फायदे मिळणार आहेत- जसे की स्पॉट बुकिंग केल्यास आयव्हीएफ उपचारांवर रुपये 25,000 ची सवलत तसेच मोफत नोंदणी, सल्लामसलत, सोनोग्राफी आणि सीमेन अ‍ॅनालिसिस (वीर्य तपासणी). हे शिबिर सर्वांसाठी खुले असून विशेषतः वंध्यत्व मार्गदर्शन शोधणाऱ्या पुरुष आणि जोडप्यांसाठी उपयुक्त ठरणार आहे. हे शिबिर योग्य माहिती, पाठिंबा आणि उपचारांच्या माध्यमातून त्यांचे पालक होण्याचे स्वप्न साकार करण्यास मदत करेल.

या उपक्रमाविषयी बोलताना ओएसिस फर्टिलिटीचे सहसंस्थापक डॉ. जी. दुर्गा राव म्हणाल्या, “ओएसिस फर्टिलिटी, फर्टिलिटीला एक सामायिक यात्रा म्हणून बघते आणि यात पुरुषांची भूमिकाही तितकीच महत्त्वाची आहे. आमचे ध्येय पुरुष आणि जोडप्यांना त्यांच्या प्रजनन आरोग्याबद्दल माहितीपूर्ण निर्णय घेण्यासाठी योग्य ज्ञान, तज्ञ मार्गदर्शन आणि वैद्यकीय सहाय्य देऊन सक्षम करणे आहे. या मोफत फर्टिलिटी शिबिराच्या माध्यमातून आम्ही प्रगत पुरुष वंध्यत्व उपचार गरजूंपर्यंत पोहोचवत आहोत आणि अडथळे व कलंक दूर करत अत्याधुनिक विज्ञानाच्या आधारे खरी आशा देत आहोत. आम्ही असा एक मंच तयार करत आहोत जिथे पुरुष वंध्यत्वावर सन्मानपूर्वक आणि उपायधारित खुली चर्चा घडून येईल.”

ओएसिस फर्टिलिटी नाशिकचे विभागीय वैद्यकीय प्रमुख आणि फर्टिलिटी तज्ज्ञ डॉ. निलेश उन्मेश  बलकवडे म्हणाले, “प्रगत वंध्यत्व उपचार सर्वांना उपलब्ध करून देण्याच्या आमच्या सततच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणजे हे मोफत फर्टिलिटी शिबिर आहे. नाशिकमधील ओएसिस फर्टिलिटीमध्ये आम्ही अत्याधुनिक विज्ञानाधारित उपचार आणि वैयक्तिक काळजी यांचा संगम साधून जोडप्यांना पालकत्वाच्या प्रवासात साथ देतो. या उपक्रमाचा उद्देश वंध्यत्वावरील मौन तोडणे, तज्ञ मार्गदर्शन देणे आणि परवडणारे उपाय उपलब्ध करून देणे आहे – ते सुद्धा एका आधुनिक आणि आधार देणाऱ्या वातावरणात.”

त्यांच्या अनुभवसंपन्नतेने, प्रगत तंत्रज्ञानाने आणि रुग्ण-केंद्रित दृष्टिकोनाने, ओएसिस फर्टिलिटी प्रत्येक जोडप्याला उच्च दर्जाचे, परवडणारे उपाय उपलब्ध करून देतो. पालक होण्याच्या आपल्या स्वप्नाच्या दिशेने पहिला टप्पा म्हणून आजच मोफत कंसल्टेशनसाठी 9513731635 या क्रमांकावर संपर्क साधा.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 2 9 1 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे