
सुनिल आण्णा सोनवणे, चांदवड/प्रतिनिधी-: चांदवड शहरात मकरसंक्रांतीच्या दिवशी पतंग उडवितांना दुचाकीने घरी जात असलेल्या 28 वर्षीय तरुणांचा गळा चिरून गंभीर जखमी झाला. त्याच्यावर खासगी दवाखान्यात उपचार सुरू असून त्याला 14 टाके पडले आहे. तर 13 व 7 वर्षीय लहान मुलांचे हात चिरले गेले. प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे मकरसंक्रांतीच्या दिवशी तरुणांनी सरासपणे नायलॉन मांजाचा वापर केल्याचे दिसून आले. मकरसंक्रांती निमित्त पतंग उडविताना नायलॉन मांजाचा वापर होऊ नये यासाठी प्रशासनाने पाऊले उचली मात्र प्रशासनाचे नियम धाब्यावर ठेवीत विक्रेत्यांनी नायलॉन मांजाची छुपी विक्री केल्याचे दिसून आले. याचा प्रत्यक्ष अनुभव मकरसंक्रांतीच्या दिवशी बघावयास मिळाला. तालुक्यातील न्हनावे येथील बापू ज्ञानेश्वर ठाकरे (28) हा युवक दुचाकीने चांदवडला कामानिमित्त आला होता. दुपारी 2.30 च्या सुमारास चांदवड-मनमाड रोडने घरी जात असताना विश्राम गुहा जवळील गणुर चौफुली येथे पतंग कटुन नायलॉन मांजा त्याच्या मानेला अडकला. मांजा धारधार असल्याने त्याचा गळा चराचर चिरला. या घटनेत बापू ठाकरे हा युवक रक्तबंबाळ झाला. त्यास नागरिकांनी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले त्यावर प्राथमिक औषधोपचार करून एका खासगी दवाखान्यात हलवण्यात आले. त्यावर तत्काळ शस्त्रक्रिया करण्यात आली तब्बल 14 टाके पडले.यावेळी त्यांच्या मानेच्या नसेपर्यन्त घाव गेला मात्र नस थोडक्यात बचावल्याने पुढील अनर्थ टळला.
या घटनेनंतर गोरख चिंधु बोरसे ( 13,चिंचवे) व अनुराग अनुकुल (7, चांदवड) यांचे नायलॉन मांजाने हात कापले गेले. त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. तर
शरद अशोक चव्हाण यांचा गळा कापला गेला. त्यावर उपचार करण्यात आले.