Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसत्कारसामाजिक

जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत मंत्री छगन भुजबळ यांच्या विचारधारेवर काम करणाऱ्या सक्षम चेहऱ्यांना संधी द्या – माजी खासदार समीर भुजबळ

0 4 2 9 5 7

माजी खासदार समीर भुजबळ यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पणमंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली येवला मतदारसंघात विकासाची गंगा कायम सुरू राहील – माजी खासदार समीर भुजबळ

जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत मंत्री छगन भुजबळ यांच्या विचारधारेवर काम करणाऱ्या सक्षम चेहऱ्यांना संधी द्या – माजी खासदार समीर भुजबळ

येवला, दि.२४ जानेवारी :- मंत्री छगन भुजबळ यांच्या माध्यमातून येवला मतदारसंघात पायाभूत सुविधांची असंख्य विकासकामे मार्गी लागली असून, येणाऱ्या काळातही कोट्यवधी रुपयांची विकासकामे करण्यात येतील. येवला मतदारसंघात विकासाची ही गंगा अविरतपणे सुरू राहील असे प्रतिपादन माजी खासदार समीर भुजबळ यांनी केले. त्यांनी आज विविध ठिकाणी ग्रामस्थांशी विकासकामांच्या प्रश्नांबाबत संवाद साधला.

राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ व आमदार पंकज भुजबळ यांच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेल्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण माजी खासदार समीर भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी ज्येष्ठ नेते अंबादास बनकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, ज्येष्ठ नेते अरुणमामा थोरात, विश्वास आहेर, संभाजी पवार, येवला नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी, जलचिंतन सेलचे जिल्हाध्यक्ष मोहन शेलार, तालुकाध्यक्ष साहेबराव मढवई, प्रा.अर्जुन कोकाटे, संजय बनकर, सचिन कळमकर, प्रा. ज्ञानेश्वर दराडे, बाळासाहेब गुंड, नवनाथ काळे, मच्छिंद्र थोरात, संजय पगार, नितीन गायकवाड, देविदास निकम, भगवान ठोंबरे, विनोद ठोंबरे, सरपंच शिल्पा मढवई, सरपंच किशोर लभडे, सरपंच कल्पना शिंदे, सरपंच कृष्णा कोकाटे,सरपंच पुंडलिकराव होंडे, कचरु पाटील, गणेश मोरे, श्रावण ठोंबरे, संतोष लभडे,अंकुश मढवई, अमोल मढवई, साईनाथ मढवई, महेश मढवई, रामनाथ देवढे, संतोष मढवई, मिलिंद गुंजाळ, बन्सी गुंजाळ, चिंतामण गुंजाळ, बाबासाहेब शिंदे, गोरखनाथ खराडे, भागवत खराटे, प्रमोद पाटील, भाऊसाहेब कळसकर, तुळशीराम कोकाटे, पी. के.काळे, दत्तू काळे, अशोक काळे,यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी माजी खासदार समीर भुजबळ म्हणाले की, दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत असून त्यासोबत विकासाशी संबंधित अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. मात्र मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली मतदारसंघात विकासाची गंगा अखंडपणे सुरू राहील. नागरिकांनी दिलेली निवेदने व मांडलेले प्रश्न तातडीने मार्गी लावण्यात येतील, असा विश्वास त्यांनी दिला.

ते म्हणाले की, गावांतर्गत वाद बाजूला ठेवून ग्रामस्थांनी विकासाला प्राधान्य द्यावे, असे आवाहन करत सर्व प्रश्न सोडविण्यास प्राधान्य देण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. पर्यटन विकासाची कामे मार्गी लावत असताना महिलांना स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येतील. तसेच चिचोंडी एमआयडीसीमध्ये स्थानिक युवकांना रोजगार देण्यासाठी प्राधान्य राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले की, मंत्री छगन भुजबळ यांच्या विचारधारेवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना व सक्षम चेहऱ्यांना संधी दिली पाहिजे. आपली माणसे निर्णयक्षम पदांवर असतील, तर विकासाची अधिक कामे प्रभावीपणे करता येतील. स्थानिक नागरिकांना विश्वासात घेऊन आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये योग्य उमेदवारांना संधी दिली जाईल. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये मंत्री छगन भुजबळ यांच्या विचारांच्या उमेदवारांना संधी देण्याचे आवाहन करत, मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली येवला मतदारसंघात विकासाची गंगा कायम सुरू राहील, असा विश्वास माजी खासदार समीर भुजबळ यांनी व्यक्त केला.

या विकास कामांचे झाले भूमिपूजन व लोकार्पण

बदापूर येथे महादेव मंदिर सभामंडप उद्धाटन

चिचोंडी खु. येथे आरोग्य उपकेंद्राचे लोकार्पण (र.रु.५८लक्ष)

चिचोंडी खु. येथे स्थानिक विकास निधी अंतर्गत सभामंडपाचे बांधकाम करणे कामाचे लोकार्पण (र. रु. २० लक्ष)

चिचोंडी बु. येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले-गांव तेथे अभ्यासिका या उपक्रमा अंतर्गत ग्रामपंचायत मालकीच्या इमारती मधील अभ्यासिका/वाचनालयाचे उद्घाटन

स्थानिक विकास निधी मधील डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम अभ्यासिका इमारत दुरुस्ती व वॉलकंपाऊंड बांधणे या कामाचे भूमिपूजन (र.रु.१५लक्ष)

चिचोंडी बु. येथे मुलभूत सुविधा अंतर्गत सभामंडपाचे बांधकाम करणे कामाचे लोकार्पण (र.रु.२० लक्ष)

भिंगारे येथे मुलभूत सुविधा अंतर्गत जि.प. शाळा बांधकाम करणे कामाचे लोकार्पण.(र.रु. १० लक्ष)

भिंगारे येथे स्थानिक विकास निधी अंतर्गत शाळा खोली बांधकाम कामाचे लोकार्पण (र.रु. १० लक्ष)

महालखेडा पा. येथील तांडावस्ती (तुकाराम नगर) मध्ये रस्ता कॉंक्रिटीकरण कामाचे भुमीपूजन (र.रु. १०लक्ष)

आ.पंकज भुजबळ यांच्या स्थानिक विकास निधी अंतर्गत महालखेडा पा. आदिवासी वस्ती डोबेवाडी रस्ता कॉक्रिटीकरण करणे कामाचे भुमीपूजन (र.रु.१०लक्ष)

महालखेडा चां. येथे ग्राम महसुल अधिकारी कार्यालय बांधकाम करणे कामाचे भुमीपूजन

सत्यगांव येथील सोलर प्लांटचे लोकार्पण (र.रु. ३३०लक्ष)

सत्यगांव येथे स्थानिक विकास निधी अंतर्गत रस्ता कॉकिटीकरण करणे कामाचे भुमीपूजन (र.रु. २०लक्ष)

मानोरी बु. येथे खडकीनाला मानोरी ते कोपरगांव हायवे पर्यंत रस्ता कॉकिटीकरण करणे कामाची पहाणी (र.रु. ५१४ लक्ष)

मानोरी बु. येथील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले-गांव तेथे अभ्यासिका या उपक्रमा अंतर्गत ग्रामपंचायत मालकीच्या इमारतीमधील वाचनालयाचे उद्घाटन

पुरातन श्री राघवेश्वर महादेव मंदिराच्या कामाची पाहणी

केंद्र सरकारच्या नमोतीर्थ योजनेतून चिचोंडी खुर्द येथील पुरातन श्री राघवेश्वर महादेव मंदिराचा ४ कोटी ५० लक्ष निधीतून विकास करण्यात येत आहे. माजी खासदार समीर भुजबळ यांनी आज या मंदिराच्या कामाची पाहणी केली. तसेच यावेळी श्री राघवेश्वर महादेव मंदिरात मनोभावे दर्शन घेतले. या मंदिराचा क वर्ग देवस्थान मध्ये समावेश करण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल असे त्यांनी यावेळी सांगितले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 2 9 5 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे